मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर अभिनेता सुनील शेट्टी याच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. सुनील शेट्टी याची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटर केएल राहुल याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. २३ जानेवारी रोजी अथिया आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आता या सेलिब्रिटी विवाहाबद्दल अनेक अपडेट समोर येत आहेत. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा आहे.
लग्न २३ जानेवारी रोजी होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. पण याबद्दल अथिया आणि केएल राहुल यांच्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. २२ जानेवारी रोजी मेहंदी सोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नासाठी फक्त १०० पाहुण्यांची यादी तयार कण्यात आली आहे.
अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये सलमान खान, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जॅकी श्रॉफ पासून अक्षय कुमार पर्यंत सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. शिवाय लग्नात हजर राहणाऱ्या सेलिब्रिटींना काही अटींचं पालन करावं लागणार आहे.
पाहुण्यांना लग्नात फोटो काढता येणार नाहीत. फोन सोहळ्यापासून दूर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय अनेक बॉलिवूडकरांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही आठवड्यांनी सेलिब्रिटींलाठी मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.
अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर हे लग्न पार पडणार असल्याचं कळतंय. 21 जानेवारीपासून या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
अथिया आणि केएल राहुल हे त्यांच्या रिलेशनशिपविषयी माध्यमांसमोर कधीच मोकळेपणे बोलले नाहीत. मात्र सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्यात दोघंही कधीच मागे हटत नाहीत.