COVID 19 Helping Hand | आयुष्मान खुरानाकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत, कोरोना काळात चाहत्यांनाही केले मदतीचे आवाहन!
लिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि त्यांची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि त्यांची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केले आहे आणि या संकट परिस्थितीत आपल्या चाहत्यांनीही सरकारला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे (Ayushmann Khurrana and Tahira Kashyap Donates Money in CM relief fund for helping corona patients).
सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे आणि राज्यातील परिस्थिती खूप नाजूक आहे. रुग्णालयांमध्ये सर्वत्र रुग्णांची गर्दी असते आणि अशा परिस्थिती आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत एकमेकांना मदत केल्याशिवाय लोकांना सरकारकडून जास्त अपेक्षा नाहीत.
सगळ्याच राज्यात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता आहे. सरकारने एक प्रकारे हात वर केले आणि हा विषाणू जास्त पसरू नये यासाठी लॉकडाऊन लादण्यात आले आहे. ज्यामुळे आर्थिक कामे ठप्प झाली आहेत. लोकांकडे रोजगार नाही आणि या विषाणूने आधीच त्यांची कंबर मोडली आहे.
वाचा आयुष्मानची पोस्ट
View this post on Instagram
आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पत्र अपलोड केले आहे, ज्यात त्यांनी अशा प्रत्येक भारतीयांचे आभार मानले आहेत ज्यांनी त्यांना या संकटातून सतत पीडित लोकांसाठी योगदान देण्यास प्रेरित केले आहे (Ayushmann Khurrana and Tahira Kashyap Donates Money in CM relief fund for helping corona patients).
आयुष्मान-ताहिरा म्हणतात…
त्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “आपण गेल्या एका वर्षापासून या आपत्तीला तोंड देत आहोत. या साथीने आपली मनं मोडली आहेत, वेदना व दु:ख सहन करण्यास भाग पाडले आहे. एकमेकांशी ऐक्य साधत, मानवता दाखवत या संकटाचा कसा सामना करावा हे आपण दाखवून दिले आहे. आज पुन्हा एकदा हा साथीचा रोग आपल्याला धैर्य, प्रतिकारशक्ती आणि एकमेकांना पाठिंबा दाखवण्यास सांगत आहे.”
पॉवर कपल पुढे म्हणाले की, “संपूर्ण भारतभर लोक शक्य तितक्या एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. ताहिरा आणि मी ज्यांना आम्हाला अधिक मदत करण्यासाठी प्रेरित केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा आम्ही सतत प्रयत्न केला आहे आणि आता आवश्यकतेच्या क्षणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये देखील हातभार लावला आहे.”
समाज म्हणून एकत्र येऊया!
आयुष्मान आणि ताहिरा यांनी अधिकाधिक भारतीयांनी पुढे येऊन गरजूंना मदत करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, “ही वेळ आहे जेव्हा आपण एक समाज म्हणून पुढे आले पाहिजे आणि एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. लोकांना शक्य तितक्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण सर्वजण स्वतःहून मदत करून आपले योगदान देऊ शकतो.”
(Ayushmann Khurrana and Tahira Kashyap Donates Money in CM relief fund for helping corona patients)
हेही वाचा :
PHOTO | ‘पप्पी दे पारू’नंतर स्मिता गोंदकर चमकणार ‘साजणी तू’ गाण्यात!