मुंबई | 21ऑगस्ट 2023 : बॉलिवूडच्या टॅलेंटड अभिनेत्यांपैकी एक असलेल्या आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana ) त्याच्या करीअरची सुरूवात वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी केली आणि यश मिळवत तो नव्या युगाच्या सिनेमाचा पोस्टर बॉय बनला. खरंतर आयुष्मान ज्या पद्धतीचे चित्रपट करतो, त्यापेक्षा ड्रीम गर्ल (Dream Girl) चित्रपटाची फ्रँचायझी खूप वेगळी आहे. 2019 साली आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आणि तो ब्लॉकबस्टरही ठरला.
ड्रीम गर्ल हा एक वेगळा चित्रपट होता, कारण त्यामध्ये मसाला कमर्शिअल चित्रपटाची सर्व वैशिष्ट्ये होती. आणि आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटामुळेही प्रेक्षकांमधील उत्साह आणखी वाढलेला दिसत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाद्वारे आयुष्मान खुराना हा बॉलिवूडचा एकमेव तरुण स्टार बनणार , ज्याच्याकडे कमर्शिअल कॉमेडी चित्रपटाची फ्रँचायझी आहे.
काय म्हणाला आयुष्मान ?
याबाबत बोलताना आयुष्मान सांगतो की, ‘ माझ्या कारकिर्दीमध्ये मला हिट कॉमेडी फ्रँचायझी मिळेल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. खरं सांगायचं झालं तर हे माझ्यासोबत चुकून घडलं. सुदैवाने, मी काही अशा प्रोजेक्ट्सचा शोध घेतला जे मजेदार तस असतील पण त्याद्वारे एखादा मेसेजही देता येईल आणि शक्य तितक्या लोकांशी कनेक्ट होता येईल. मला ड्रीम गर्ल फ्रँचायझी करण्याची संधी मिळाली. ही खरोखरच एक ब्रेक-आउट संकल्पना आहे जी माझ्या पिढीतील इतर नायकांनी शोधली नाही.’
“ एका कलाकाराच्या रुपात मला नेहमीच ओरिजनल रहायला आणि लोकांसमोर आईट-ऑफ-द- बॉक्स संकल्पना आणायला आवडतात. तुम्हाला ड्रीम गर्ल फ्रँचायझीपेक्षा जास्त काही मिळू शकत नाही. याच कारणामुळे पहिला चित्रपट लोकांना प्रचंड आवडला असं मला वाटतं. आणि आता ड्रीम गर्ल 2 च्या ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स पाहून असं समजतंय की आम्ही लोकांना ठोस, चांगल मनोरंजन देण्याच्या योग्य मार्गावर आहोत. लोकांना खरोखरच ड्रीम गर्ल 2 आवडेल अशी मला आशा आहे, ‘असंही आयुष्मान म्हणाला.