Happy Birthday Prabhas |  वाढदिवसानिमित्ताने ‘बाहुबली’ प्रभासच्या चाहत्यांना खास सरप्राईझ!

‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अवघ्या मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध झालेला ‘डार्लिंग प्रभास’ आज (23 ऑक्टोबर) आपला 41वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Prabhas |  वाढदिवसानिमित्ताने ‘बाहुबली’ प्रभासच्या चाहत्यांना खास सरप्राईझ!
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी त्यानं 25 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. त्यानं या चित्रपटासाठी स्वत:वर खूप मेहनत घेतली होती.
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 11:38 AM

मुंबई : ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अवघ्या मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध झालेला ‘डार्लिंग प्रभास’ आज (23 ऑक्टोबर) आपला 41वा वाढदिवस (Baahubali Actor Prabhas Birthday) साजरा करत आहे. 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नईमध्ये प्रभासचा जन्म झाला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रभासच्या नावाचा डंका होताच मात्र, ‘बाहुबली’मुळे तो बॉलिवूडमध्ये नावाजला जाऊ लागला. आज वाढदिवसानिमित्ताने त्याच्या  चाहत्यांना एक खास सरप्राईझ मिळणार आहे. त्याचा गाजलेला ‘बाहुबली’ हा चित्रपट अमेरिकेत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.( Baahubali Actor Prabhas Birthday special  story)

‘बाहुबली’ या चित्रपटानंतर प्रभास ‘बाहुबली’ याच नावाने ओळखला जाऊ लागला आहे. 1500 करोडचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटासाठी प्रभासने तब्बल 5 वर्ष चित्रीकरण केले होते. या 5 वर्षात त्याने चित्रपटासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी कसून मेहनत घेतली होती. प्रभास एकावेळी केवळ एकच चित्रपट करतो. ‘बाहुबली’च्या 5 वर्षांतदेखील त्याने इतर कुठलाच चित्रपट स्वीकारला नव्हता. ‘बाहुबली’साठी त्याने तब्बल 25 करोड इतके मानधन आकारले होते.

प्रभूदेवाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

प्रभासने 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर तो ‘राघवेंद्र’, ‘योगी’, ‘डार्लिंग’, ‘निरंजन’, ‘रेबेल’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत झळकला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो लहानशा भूमिकेत झळकला होता.( Baahubali Actor Prabhas Birthday special  story)

चाहत्यांना खास सरप्राईझ!

जगभरातील प्रभासचे चाहते त्याचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. आज प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने अमेरिकेत त्याचा ‘बाहुबली’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. ‘बाहुबली’ पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची वार्ता सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखी पसरली आहे.

प्रभासच्या वाढदिवसापूर्वीच त्याच्या चाहत्यांना आणखी एक भेट देण्यात आली होती. प्रभासचा आगामी ‘राधेश्याम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. आज प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले जाणार आहे. याआधी प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये प्रभासचा डॅशिंग आणि स्टाइलिश लूक दिसला आहे. अभिनेत्री पूजा हेगडेने प्रभासचा हा लूक शेअर करत, ‘काहीतरी मोठे घडणार आहे’, असे म्हटले होते.( Baahubali Actor Prabhas Birthday special  story)

‘आदिपुरुष’ चित्रपटाची प्रतीक्षा

‘राधेश्याम’ चित्रपटाव्यतिरिक्त प्रभास ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीरामांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान खलनायकाची अर्थात ‘लंकेश’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

(Baahubali Actor Prabhas Birthday special  story)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.