Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींमुळे मिटला सलमान-शाहरूखमधील जुना वाद, नेमकं काय घडलं ?

काही महिन्यापूर्वीच काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूड स्टार्सशीदेखील चांगले संबंध होते. 2013 मध्ये त्यांनी अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील जुना वाद संपवण्यात मोलाची भूमिका बजावली.

Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींमुळे मिटला सलमान-शाहरूखमधील जुना वाद, नेमकं काय घडलं  ?
बाबा सिद्दीकींमुळे मिटला सलमान-शाहरूखमधील वादImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 12:38 AM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते, बाबा सिद्दीकी यांच्या वरील गोळीबाराने संपूर्ण राज्य हादरले. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास निर्मलनगर येथे बाईकवरून आलेल्या तिघांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर 4 राऊंड फायर करण्यात आले, त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला लागली. गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकी यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आल,मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजतं. गेल्या अनेक दशकांपासून राजकारणात कार्यरत असलेले बाबा सिद्दीकी हे बॉलिवूडमध्ये देखील तितकेच प्रसिद्ध होते.

बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल कळताच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हाचे सासरे हे रुग्णालयात पोहोचले.

शाहरुख-सलमान खानमधील वैर मिटवले

हे सुद्धा वाचा

सलमान खान , संजय दत्त याच्यासह अनेक अभिनेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. ते दरवर्षी ग्रँड इफ्तार पार्टी द्यायचे. या पार्टीमध्ये सलमान , शाहरूखसह अनेक मान्यवर सेलिब्रिटी आवर्जून हजेरी लावायचे. तसेच टीव्ही जगताती, छोट्या पडद्यावरूल स्टार्सही त्यांच्या पार्टीसाठी यायचे.

बाबा सिद्दीकी याची ही इफ्तार पार्टी आणखी एका कारणासाठी खास ठरली होती, कारण त्याच पार्टीमध्ये बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स सलमान खान आणि शाहरुख खान यांचे वर्षानुवर्ष सुरू असलेलं जुनं भांडण मिटलं होतं आणि ते पुन्हा मित्र बवले. बाबा सिद्दीकी यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झालं.

असं मिटलं भांडण

2008 साली अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत शाहरूख-सलमानमध्ये मोठं भांडण झालं होतं. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणेही बंद केले. या भांडणानंतर सलमान आणि शाहरुख अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये एकमेकांपासू अंतर राखतान, दूर राहताना दिसले. त्यांचं नातं खूप ताणलं गेलं. त्यांच्या या भांडणाची तेव्हा खूपच चर्चा झाली होती. मोठ्या कार्यक्रमांमध्येही एकमेकांपासून अंतर राखले आणि त्यांचे नाते खूपच ताणले गेले.

मात्र त्यांचं भांडण मिटवण्यात बाबा सिद्दीकी यांनी मोलाची भूमिका बजावली. 2013 साली बाबा सिद्दीकी यांनी या दोघांनाही त्यांच्या प्रसिद्ध इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित केले. तिथे त्या दोघांनी इतके वर्षांची नाराजी दूर केली आणि ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटले. या पार्टीत शाहरुख आणि सलमानने एकमेकांना मिठी मारून पाच वर्षांचे वैर संपवले. हे भांडण मिटवण्यात बाबा सिद्दीकी यांचा महत्वाचा वाटा होता.

दरम्यान आज बाबा सिद्दीकी यांच्यावरूल गोळीबारानंतर अनेक वर्षांपूर्वीची ही घटना पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावरील हल्ल्याबाबत चर्चा होत असून त्यांच्या इफ्तार पार्टीचे, सलमान शाहरुख सोबतचे फोटो पुन्हा व्हायरल झाले आहेत.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.