ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?
सोशल मीडिया(Social Media)वर सध्या तरुणाई आपला अधिक वेळ देते ती गाणी ऐकण्यावर, चांगल्या चित्रपटाचे व्हिडिओ (Video) तसंच ट्रेंडिंग (Trending) व्हिडिओ पाहण्यासाठी. त्यातलंच एक गाणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
मुंबई : सोशल मीडिया(Social Media)वर सध्या तरुणाई आपला अधिक वेळ देते ती गाणी ऐकण्यावर, चांगल्या चित्रपटाचे व्हिडिओ (Video) तसंच ट्रेंडिंग (Trending) व्हिडिओ पाहण्यासाठी… हिंदी, इंग्रजी गाणी हिट होतात, ती आपण पाहत, ऐकतही असतो. मात्र स्थानिक पातळीवरही अत्यंत दर्जेदार अशी गाणी तयार होत असतात. महाराष्ट्रातल्या मातीतही असे अस्सल कलाकार आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. त्यातलंच एक गाणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अहिराणीचा ठसका उत्तर महाराष्ट्रातल्या अहिराणीचा ठसका काही निराळाच. याच मातीत तयार झालेलं गाणं आहे बबल्या ईकस केसावर फुगे… यूट्यूबवर हे गाणं अत्यंत हिट असून याचे व्ह्यूज कमालीचे आहेत. 28 मे 2019ला यूट्यूबवर ते अपलोड करण्यात आलं. आणि आतापर्यंत या व्हिडिओला 24 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालेत. सचिन कुमावत(Sachin kumavat)नं या गाण्याला संगीत दिलंय. अपलोड केल्यापासून हे गाणं व्हायरल व्हायला सुरुवात झाली. आता तर अनेकांनी हे गाणं डोक्यावर घेतलंय.
कोण आहे सचिन कुमावत? सचिन कुमावत हा एक संगीतकार असून यूट्यूब(Youtube)वर सचिन कुमावत या नावाचं त्याचं चॅनेल आहे. यावर साधारण सामाजिक विषयासह विविध विषयांवर गाणी अपलोड केली जातात. विशेष म्हणजे या गाण्यांना त्याचे चाहते तसंच यूट्यूबवरचे यूझर्सदेखील आवडीनं पाहतात-ऐकतात. त्याला प्रचंड व्ह्यूज मिळतात. sachinkumavat1111 म्हणून त्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. तिथंही गाण्याचे छोटे व्हिडिओ तसंच सॉन्ग्स मेकिंग आणि इतर शॉर्ट व्हिडिओ, रिल्स पाहायला मिळतात.
‘बबल्या ईकस केसावर फुगे’विषयी… बबल्या ईकस केसावर फुगे हे गाणं सामाजिक विषयावर भाष्य करतं. बेरोजगारी हा त्याचा फोकस. अण्णा सुरवाडे यांनी या गीताचं लेखन तसंच गायन केलंय. तर संगीत सचिन कुमावत यांनी दिलंय. या गाण्यात स्वत: सचिन सुरवाडे यांच्यासह अण्णा सुरवाडे, कृष्णा जोशी, बाळू वाघ, संजय सोनवणे यांनी नृत्य केलंय. चला तर, या गाण्याचा व्हिडिओ पाहू या…
(व्हिडिओ सौजन्य – सचिन कुमावत)