‘बागबान’ फेम अभिनेत्याला अॅम्ब्युलन्सने फरफटत नेलं, साहिल चढ्ढा रुग्णालयात
'बागबान' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या मुलाची व्यक्तिरेखा अभिनेता साहिल चढ्ढा याने साकारली होती. (Actor Saahil Chadha Accident Ambulance)
मुंबई : ‘बागबान’ फेम अभिनेता साहिल चढ्ढा (Saahil Chadha) याला मुंबईत अपघात झाला. अॅम्ब्युलन्सने धडक देऊन साहिलला दोन फुटांपर्यंत फरफटत नेलं. यामुळे जखमी झालेल्या साहिल चढ्ढाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर साहिलची पत्नी प्रोमिला चढ्ढाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. (Baghban Fame Actor Saahil Chadha met with Accident in Mumbai as Ambulance Hits)
सेंट झेवियर्स कॉलेजजवळ अपघात
‘बागबान’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या मुलाची व्यक्तिरेखा अभिनेता साहिल चढ्ढा याने साकारली होती. बुधवारी साहिल आणि प्रोमिला एका मीटिंगनंतर घरी चालले होते. सेंट झेवियर्स कॉलेजच्या मागच्या गल्लीत पार्क केलेल्या गाडीकडे जाताना अॅम्ब्युलन्सने दोघांना धडक दिली. साहिल अॅम्ब्युलन्ससोबत जवळपास दोन फूट फरफटत गेला. त्यामुळे त्याच्या पोट आणि जांघांना जखम झाली. तर त्नी प्रोमिला चढ्ढाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
रुग्णवाहिकेचा वेग कमी असल्याने बचावला
साहिलला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर प्रोमिला तिच्या चुलत बहिणीसोबत राहत आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत साहिलला डिस्चार्ज मिळू शकेल. साहिलने ही घटना धक्कादायक आणि भयानक असल्याचं सांगितलं. ड्रायव्हर जास्त वेगाने रुग्णवाहिका चालवत नव्हता, त्यामुळे आपण वाचल्याचं तो सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
देवाच्या कृपेने संकट टळल्याची भावना
“मी बौद्ध धर्माचे अनुसरण करतो आणि मला असे वाटते की माझ्या आयुष्यात एक मोठी आणि नकोशी घटना टळली आहे. माझ्यावर काही दिवस डॉक्टरांची देखरेख असेल. परंतु देवाची कृपा आहे. जे काही झाले ते अतिशय धक्कादायक आणि भयानक आहे” अशी प्रतिक्रिया साहिलने दिली.
ऑक्टोबर महिन्यात प्रोमिलाची कोरोनावर मात
साहिलची पत्नी प्रोमिला चढ्ढाला ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. यानंतर चढ्ढा दाम्पत्य सुमारे 20 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहिले. ‘बागबान’ व्यतिरिक्त साहिलने ‘थोड़ा लाईफ थोड़ा मॅजिक’ आणि ‘सेक्शन 275’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (Actor Saahil Chadha Accident Ambulance)
View this post on Instagram
संबंधित बातम्या :
Suyash Tilak | कॅबला मालवाहू कंटेनरची जोरदार धडक, अभिनेता सुयश टिळक थोडक्यात बचावला!
हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड
(Baghban Fame Actor Saahil Chadha met with Accident in Mumbai as Ambulance Hits)