रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ‘भाभीजी घर पर है’च्या लेखक, अभिनेत्याचा मृत्यू; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
'भाभीजी घर पर है' मालिकेचे लेखक मनोज संतोषी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

Manoj Santoshi Passed Away: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’चे लेखक मनोज संतोषी यांचे निधन झाले आहे. २३ मार्च २०२५ रोजी सिकंदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. मनोज यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे निधन झाल्याचा आरोप केला आहे.
मनोज गेल्या काही दिवसांपासून यकृताशी संबंधीत आजारांशी झुंज देत होता. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची लीव्हर ट्रांसप्लांट सर्जरी होणार होती. पण त्यांची प्रकृती साथ देत नसल्यामुळे ही सर्जरी थांबवण्यात आली होती आणि त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. मनोज यांच्या निधनानंतर त्यांच्या जवळची मैत्रिण शिल्पा शिंदेने इंडिया टूडेशी बोलताना रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व झाल्याचे आरोप केला आहे.
कोण आहेत मनोज संतोषी?
मनोज यांच्या विषयी बोलायचे झाले तर त्यांनी आजवर ‘जीजाजी छत पर हैं’, ‘हप्पू की उलटन पलटन’, ‘एफआईआर’ या कॉमेडी मालिकांचे लेखन केले आहे. ते एक लेखक असण्यासोबतच उत्तम अभिनेते देखील होते. ते उत्तर प्रदेश येथील बुलंदशहर जिल्ह्यातील रामघाट येथील रहिवासी होते. त्यांनी कस्बा जरगंवा येथील कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. गायक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते मुंबईत आले होते. तेथे एका लेखकाशी ओळख झाल्यानंतर त्यांनी लेखक होण्याचे ठरवले. त्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.