‘भारत’चा क्लायमॅक्स लीक, 10 कोटींचा सेट सलमान उध्वस्त करणार

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच सलमानच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत उत्सूकता आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘भारत’ सिनेमाचा क्लायमॅक्स लीक झाला आहे. डीएनएच्या वृत्तानुसार, ‘भारत’ सिनेमाचा क्लायमॅक्स लीक झाला असून यात सीनसाठी तयार करण्यात आलेला 10 […]

‘भारत’चा क्लायमॅक्स लीक, 10 कोटींचा सेट सलमान उध्वस्त करणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच सलमानच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत उत्सूकता आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘भारत’ सिनेमाचा क्लायमॅक्स लीक झाला आहे. डीएनएच्या वृत्तानुसार, ‘भारत’ सिनेमाचा क्लायमॅक्स लीक झाला असून यात सीनसाठी तयार करण्यात आलेला 10 कोटींचा सेट सलमान खान उध्वस्त करताना दिसणार आहे.

वृत्तानुसार, या सिनेमाचा क्लायमॅक्स हा जबरदस्त आणि मनात धडकी भरवणारा असणार आहे. सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनसाठी तयार करण्यात आलेला 10 कोटींचा हा सेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. हा सेट दिल्लीचा आहे, याला मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये 10 कोटी खर्च करुन उभं करण्यात आलं होतं.

या सीनला शूट करण्यासाठी पूर्ण एक दिवस लागणार आहे. यामध्ये सलमान खानसोबतच जॅकी श्रॉफ, सुनिल ग्रोव्हर आणि तब्बूही दिसणार आहेत. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन बघायला मिळणार आहे. अली अब्बास जफरने सलमानच्या चाहत्यांसाठी एक अॅक्शन पॅक्ड सिनेमा बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. या सिनेमाच्या क्लायमॅक्समधील धमाकेदार सीन त्याचीच एक झलक आहे.

या सिनेमामध्ये पहिल्यांदा अभिनेत्री प्रियांका चोप्राला घेण्यात आले होते, मात्र तिच्या लग्नामुळे तिने हा सिनेमा सोडला. त्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफला हा सिनेमा ऑफर करण्यात आला. त्यामुळे सलमान-कतरिनाच्या चाहत्यांना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. ‘टायगर जिंदा हैं’ या सिनेमानंतर सलमान-कतरिना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत.

VIDEO :

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....