मंदिरांमधील भंडाऱ्यात भरायचा पोट, रस्त्यावर विकायचा बल आता करोडोंमध्ये कमावतो, पाहा कोण आहे तो अभिनेता
काही कलाकार असे आहेत ज्यांनी संघर्ष करून सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर असाच एक निर्माता आणि अभिनेता आहे ज्याच्याकडे एक वेळ चांगले कपडेही घालायला नव्हते, तसेच राहायला घर नव्हतं, खायला अन्नही मिळत नव्हतं अनेकदा त्याने उपाशी राहून दिवस काढले आहेत. पण आता हाच अभिनेता आलिशान जीवन जगत आहे.
मुंबई : आत्तापर्यंत सिनेसृष्टीतील काही असे कलाकार आहेत ज्यांनी स्ट्रगल करून आज स्वतःचं मोठं नाव केलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता यश कुमार आहे. यश कुमारने भोजपुरी सिनेसृष्टी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये त्याचा जबरदस्त प्रभाव आहे. आता तो अनेक नवीन चेहऱ्यांना चित्रपटात काम करण्याची संधी देतो. यश आज फक्त भारतीय अभिनेताच नाही तर प्रसिद्ध निर्माता देखील आहे.
यश कुमारच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर त्याने 2010 मध्ये ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ या टीव्ही सिरीयलमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने 2012 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्यानी अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आणि भोजपुरी सिनेसृतष्टी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
यशने भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याने ‘दिलदार सावरिया’ या चित्रपटातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तर यशच्या संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर तो मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील आहे. यशने करिअरसाठी मुंबईत आल्यानंतर खूप मोठा संघर्ष केला आहे. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्याच्या आयुष्यात काही दिवस असे होते की त्याने उपाशी राहून काढले आहेत. त्याच्याकडे राहायला घर देखील नव्हतं. तसंच यशने घर खर्च भागवण्यासाठी टॅक्सी देखील चालवली आहे. काही वेळा तर त्याने रस्त्यावर बल्ब देखील विकले आहेत. 2002 ते 2012 या काळात यशने खूप मेहनत घेतली. आता त्याच्या याच मेहनतीचा फळ त्याला मिळालं आहे.
2013 मध्ये यश चा नशीबच पालटलं. त्याला ‘दिलदार सावरिया’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातून यशला स्वतःची एक नवीन ओळख मिळाली. आज तो फक्त प्रसिद्ध अभिनेताच नाही तर प्रसिद्ध निर्माता देखील आहे. तसंच आता तो अलिशान बंगल्यात राहत असून त्याच्याकडे महागड्या गाड्याही आहेत. आज तो अनेक नवीन तरुणांना सिनेसृष्टीत काम करण्याची संधी देतोय.