Viral : फोटोमध्ये दिसणारी ‘ही’ चिमुकली आज करते अनेकांच्या हृदयावर राज्य, ओळखलंत का?
या फोटोतील अभिनेत्री आजच्या काळातील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तसंच ती तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
मुंबई : सध्या बॉलिवूड सिनेसृष्टीसोबतच भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीही कोणत्याही बाबतीत मागे नाहीये. बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच भोजपुरी कलाकारांनी चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. यामध्ये अशा अनेक भोजपुरी अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्याेक
असाच एका प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोतील अभिनेत्री आजच्या काळातील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तसंच ती तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
या फोटोत दिसणार्या गोंडस मुलीचे नाव सांगू शकता का? ही मुलगी भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चाहते नेहमी तिच्या ग्लॅमरस स्टाईलकडे आकर्षित होतात. तसंच ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
View this post on Instagram
बिग बॉसमध्ये केलं होतं लग्न
या गोंडस मुलीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसंच तिनं अनेक हिंदी टिव्ही शोमध्येही काम केलं आहे. तिनं तिच्या दमदार अभिनयाने लोकांना वेड लावले आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
विशेष सागायचं झालं तर या अभिनेत्रीचे लग्न सलमान खानच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या घरात झाले होते. ही अभिनेत्री बिग बॉस 10 या सीझनमध्ये दिसली होती. तसंच या शोमध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंहसोबत लग्न केलं होतं.
View this post on Instagram
आता तर सर्वांनीच या अभिनेत्रीला ओळखलं असेल. ही क्यूट मुलगी दुसरी कोणी नसून मोनालिसा आहे. इंस्टाग्रामवर तिनं तिचा बालपणीचा फोटो शेअर केला होता. यात ती खूप क्यूट दिसत आहे. सध्या मोनालिसाचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे. ती जेवढी लहाणपणी गोंडस दिसायची तितकीच आताही क्यूट आणि सुंदर दिसत आहे.