Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, अभिनेत्री बनली आई

| Updated on: Jul 05, 2023 | 5:19 PM

मनोरंजनसृष्टीला रामराम करूनही सोशल मीडियावर चर्चेत असलेली अभिनेत्री सना खान आई बनली आहे. तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, अभिनेत्री बनली आई
सना खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Image Credit source: instagram
Follow us on

Sana Khan Became Mother : मनोरंजन क्षेत्रातून बाहेर पडली असली तरी बिग बॉस फेम अभिनेत्री सना खान (Sana Khan) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या प्रेग्नन्सीमुळे लाईमलाईटमध्ये होती. आता सनाने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सना खान आई बनली (Sana Khan Became Mother)असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्या फॅन्ससोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

गेल्या काही काळापासून सना खान तिच्या प्रेग्नेंसी स्ट्रगलबद्दल सतत बोलत होती. मात्र आज तिने गुड न्यूज शेअर केली असून कमेंट्सद्वारे सर्वजण तिचे अभिनंदन करत आहेत.

सना खान सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. पती अनस सह ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओजही शेअर करत असते. आई झाल्याची गुड न्यूजही सनाने एका व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. बिगबॉस फेम या अभिनेत्रीने एका ॲनिमेटेड व्हिडीओ द्वारे ही बातमी पोस्ट करत देवाचे आभारही मानले आहेत. तसेच शुभेच्छांसाठी तिने तिच्या फॅन्सनाही धन्यवाद दिले आहेत.

फॅन्सच्या शुभेच्छांचा वर्षाव

प्रेग्नंट असल्यापासून सना खान सतत या फेजशी संबंधित तिचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत होती. गरोदरपणात चालणे, उठणे आणि बसण्यासही बराच त्रास झाल्याचे तिने नमूद केले होते. अभिनय सोडल्यानंतर सना खान तिच्या वैयक्तिक आयुष्यात पूर्णपणे मग्न झाली आहे. तिने नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न केले. आज तिने ही गुड न्यूज शेअर केल्यावर फॅन्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.