Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला जखमी!

घरातील कामांची विभागणी झाल्यावर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) स्वयंपाक घरात काम करत असताना दुखापतग्रस्त झाला आहे.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला जखमी!
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 12:54 PM

मुंबई :बिग बॉस’चे 14वे पर्व दणक्यात सुरू झाले आहे. शनिवारपासून (3 ऑक्टोबर) या नव्या पर्वास सुरुवात झाली आहे. पुढचे तीन-साडेतीन महिने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) या पर्वात पहिल्याच दिवशी दोन अभिनेत्रींमध्ये चांगलीच जुंपली. यानंतर दुसऱ्या दिवशी ‘बिग बॉस’च्या घरातील सिनिअर स्पर्धक अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) जखमी झाला आहे (Bigg Boss 14 Actor Sidharth Shukla injured in BB House).

‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss) घरातील नव्या स्पर्धकांना कामे वाटून देण्याची जबाबदारी मागील पर्वातील तीन स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla), गौहर खान, हीना खान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’ने गौहर खानला कन्फेशन खोलीत बोलावून नियमावली दिली. या नियमावलीनुसार, ‘बिग बॉस’च्या स्वयंपाक घराचा ताबा गौहरकडे सोपवण्यात आला आहे. तर, बेडरूम संबंधित सर्व निर्णय सिद्धार्थ शुक्ला घेणार आहे. ‘बिग बॉस 14’चे आकर्षण असणारे बीबी मॉल, स्पा आणि जिम हीना खानच्या देखरेखीत असणार आहे.

घरातील कामांची विभागणी झाल्यावर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) स्वयंपाक घरात काम करत असताना दुखापतग्रस्त झाला आहे. भाजी चिरत असताना त्याचे बोट कापल्याने घरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सिद्धार्थच्या जखमेवर औषध लावण्यासाठी घरातील इतर सदस्यांची धावपळ सुरू झाली होती. मात्र, मामुली जखम असल्याचे म्हणत सिद्धार्थने सगळ्यांना टाळले आहे.( Bigg Boss 14 Actor Sidharth Shukla injured in BB House)

‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवशी झाला हंगामा

सगळ्या स्पर्धकांची दणक्यात एंट्री झाल्यांनतर पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss) घरात वादाची ठिणगी पडली. घरातील कामांच्या विभागणी दरम्यान, निक्की तंबोली (Nikki Tamboli) आणि जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक झाली.

घरात प्रवेश केल्यापासूनच निक्की तंबोली आणि एजाज खानमध्ये छोटे छोटे खटके उडालेले पाहायला मिळाले. मात्र कालच्या (4 ऑक्टोबर) भागात निक्की (Nikki Tamboli) आणि जास्मीनमध्ये (Jasmin Bhasin) जोरदार भांडण झालेले पाहायला मिळाले. घरातील कामांची विभागणी ही या भांडणाचे कारण ठरली आहे. कामांच्या विभागणी दरम्यान, भांडी घासण्याच्या कामावरून या दोघींमध्ये भांडण झाले.

नखं खराब होतील, असे कारण देत निक्कीने घरातील भांडी घासण्यास नकार दिला. जास्मीन निक्कीला सुरुवातीला थोडे सहकार्य करण्यास सांगितले. मात्र तिने काही ऐकले नाही. त्यानंतर एजाजही निक्कीला समजावताना दिसला. या दोघींमध्ये भांडण झाल्यानंतर, शोमध्ये दोघींची रडारड देखील पाहायला मिळाली.

(Bigg Boss 14 Actor Sidharth Shukla injured in BB House)

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद, जास्मीन भसीन-निक्की तंबोलीमध्ये शाब्दिक चकमक

Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!

PHOTO | Bigg Boss 14 House Tour | पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरात रेस्टोरेंट, स्पा, थिएटर, मॉलचा समावेश!

Bigg Boss 14 Grand Premier : ‘राधे माँ’ची बिग बॉसमध्ये एन्ट्री, बिग बॉससाठी प्रार्थना

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.