Bigg Boss 14 | कविता कौशिकचा एजाजला धक्का, हिंसक वर्तनामुळे घराबाहेर जाणार?

कविता आणि एजाज खान यांच्यात किचनमध्ये सुरू झालेली झुंज आता हिंसक वळण घेणार आहे.

Bigg Boss 14 | कविता कौशिकचा एजाजला धक्का, हिंसक वर्तनामुळे घराबाहेर जाणार?
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 6:50 PM

मुंबई :बिग बॉस 14’च्या घरातील मैत्रीमध्ये आता फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. एजाज खान (Eijaz Khan) आणि कविता कौशिक (Kavita Kaushik) यांच्यातील मैत्री आता दुष्मनीत बदलली आहे. पुढच्या एपिसोडमध्येही कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळणार आहेत. कविता आणि एजाज खान यांच्यात किचनमध्ये सुरू झालेली झुंज आता हिंसक वळण घेणार आहे. एजाज कविताच्या जवळ जाऊन भांडू लागताच कविताने एजाजला सरळ ढकलेले आहे. कविताच्या या हिंसक खेळीमुळे आता ती घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight).

कविता-एजाज यांचे भांडण पाहून निक्की तंबोली आणि अली गोनी कविताला समजवण्यासाठी पुढे येतात. कोणीही एकमेकाला धक्का मारणार नाही, असा आदेश कर्णधार अली गोनी देतो. मात्र, संतापलेली कविता, माझ्यासमोर जो कोणी येईल त्याला मी धक्का मरेन, असे म्हणताना दिसते.

(Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight)

एजाजची बिग बॉसकडे तक्रार

कविताने धक्का दिल्यावर चिडलेला एजाज कविता कौशिकवर ओरडण्यास सुरुवात करतो. पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये घमासान सुरू झाले. यानंतर एजाजने कॅमेरासमोर उभे राहत ‘बिग बॉस’कडे याची तक्रार केली. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याने आणि हिंसा केल्याने कविताला घराबाहेर करण्यात यावे, अशी मागणी एजाजने केली आहे (Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight).

दिवाळीच्या दिवशी कविता-अलीमध्ये जुंपली

दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस 14’च्या घरात बरेच बॉम्ब फुटताना दिसले. सणाच्या निमित्ताने घरात बरीच धमाल मस्ती पाहायला मिळाली. आनंदाने सुरू झालेला दिवस अखेर भांडणांनीच संपला. नाश्त्याच्या वेळी कविताच्या आरोपांमुळे घरात चांगलीच वादावादी पाहायला मिळाली. ‘पब्लिक डिमांड’वर घरात आलेल्या कविता कौशिकने कर्णधार अली गोनीवर गटबाजी करत असल्याचा आरोप लावला. त्यांनतर अली गोनी आणि कवितामध्ये जोरदार वाद रंगले होते.

‘बिग बॉस 14’च्या ‘वीकेंड का वार’च्या सुरूवातीला घरातील लोक दिवाळी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसले. पारंपरिक भारतीय लूक तसेच डोक्यावर कव्वाली टोपी परिधान करुन स्पर्धकांनी सलमान खानचे स्वागत केले. तर, दिवाळी निमित्ताने घरात कव्वालीची मैफिल रंगली होती. राहुल वैद्य आणि जान कुमार सानू या दोघांनीही ‘कव्वाली’  सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, कव्वालीच्या या कार्यक्रमानंतर आता कविता कौशिक आणि ‘कर्णधार’ अली गोनी यांच्या दरम्यान जोरदार भांडण झाले होते.

(Bigg Boss 14 Kavita Kaushik Push Eijaz Khan During Fight)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.