Bigg Boss 14 | घराला अद्याप ‘कर्णधारा’ची प्रतीक्षा, निक्की-जान-पवित्रा-एजाजमध्ये तूफान वादावादी!

जास्मीन भसीन, अली गोनी, कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यादरम्यान हा ‘कर्णधार’पदाचा सामना रंगणार आहे. ‘बिग बॉस’ने राहुल वैद्यला या खेळाचा संचालक बनवले आहे.

Bigg Boss 14 | घराला अद्याप ‘कर्णधारा’ची प्रतीक्षा, निक्की-जान-पवित्रा-एजाजमध्ये तूफान वादावादी!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:26 PM

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरातील नवी सकाळ जोरदार भांडणांनी सुरू झाली. सकाळी सकाळीच निक्की तंबोली आणि जान कुमार सानूमध्ये जोरदार वादावादी रंगली होती. वापरलेला टिश्यू पेपर कचऱ्याच्या डब्यात टाकण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. निक्की आणि जानच्या या वादामुळे चिडलेल्या ‘बिग बॉस’ने जुना ‘कॅप्टन’सी टास्क (Captaincy Task) रद्द करत, नव्या टास्कची घोषणा केली. त्यामुळे या आठवड्यात घराला अद्याप ‘कर्णधार’ मिळालेला नाही (Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task).

या नव्या कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील जुन्या कर्णधारांनाच सहभागी होता येणार आहे. इतर स्पर्धकांना या खेळात सहभागी होता येणार नाही. जास्मीन भसीन, अली गोनी, कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यादरम्यान हा ‘कर्णधार’पदाचा सामना रंगणार आहे. ‘बिग बॉस’ने राहुल वैद्यला या खेळाचा संचालक बनवले आहे.

‘कर्णधार’ पदाच्या खेळीला सुरुवात

या टास्कमध्ये चारही स्पर्धकांना चार वेगवेगळ्या बॉक्समध्ये बंद करण्यात आले आहे. या बॉक्सला काही छिद्र पाडण्यात आली आहेत. जो स्पर्धक या बॉक्समध्ये सर्वात जास्त काळ राहील, त्याच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडणार आहे. एजाजच्या खांद्याला दुखापत झाल्याने पवित्रा त्याला मदत करणार आहे (Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task).

(Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task)

घरातल्यांकडून खेळाला सुरुवात

या टास्कदरम्यान घरातील इतर स्पर्धकांनी बॉक्समध्ये बंद असणाऱ्या स्पर्धकांना त्रास देण्यास सुरुवात केली. फोबियामुळे अली गोनी या खेळातून स्वतः आऊट झाला. कविता कौशिकला त्रास देऊ पाहणाऱ्या जान कुमार सानूला निक्कीने रोखले. यावर जान कुमार सानू निक्कीला म्हणाला की, त्याला कविताला या घराची कर्णधार होवू द्यायचे नाही. जान कविताच्या बॉक्समध्ये तेल आणि स्प्रे टाकतो. तर, दुसरीकडे राहुल पवित्राच्या बॉक्समध्ये स्प्रेची फवारतो. यावरून राहुल आणि एजाजमध्ये वाद झाले.

एजाज आणि पवित्रामध्ये वाद

अली खेळातून बाद झाल्यानंतर एजाजने देखील स्वतःहून बॉक्स उडवला आणि पवित्राला खेळाबाहेर केले. पवित्रा बॉक्समधून बाहेर पडल्याने आता ती नॉमिनेट झाली आहे. यावर संतापलेल्या जान कुमार सानूने एजाज खानला बऱ्याच गोष्टी सुनावल्या. ज्या व्यक्तीने कायम तुला साथ दिली, त्याच व्यक्तीसोबत तू असे का करतोस, असा प्रश्न जानने एजाजला केला. जान दुःखी झाल्याने पवित्रा आणि एजाजने एकमेकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने दोघांनी एकमेकांना दोष द्यायला सुरुवात केली. यानंतर पवित्रा-एजाजमध्ये जोरदार भांडण झाले. या सगळ्या वादात मात्र, अजूनही घराला कर्णधार मिळालेला नाही.

(Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.