Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांवर सलमानचा संताप, एक स्पर्धक ‘आऊट’ तर दुसरीची पुन्हा ‘एंट्री’!
मागच्या आठवड्यातील स्पर्धकांच्या वागणुकीमुळे सलमान चांगलाच भडकलेला दिसला.
मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात ‘वीकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खानने (Salman Khan) स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. मागच्या आठवड्यातील स्पर्धकांच्या वागणुकीमुळे सलमान चांगलाच भडकलेला दिसला. घरातल्यांची शाळा सुरू करण्यापूर्वी सलमानने कविता कौशिकच्या प्रवासाची झलक दाखवली. यानंतर ‘पब्लिक डिमांड’वर तिला पुन्हा एकदा घरात एंट्री देण्यात आली. यावेळी वाईल्ड कार्डमध्ये एंट्री झालेल्या नैना सिंहला ‘बिग बॉस’चे घर सोडावे लागले (Bigg Boss 14 Latest Update Salman Khan in Weekend ka vaar).
या भागाच्या दरम्यान, सलमानने सगळे स्पर्धक घरात खोटा मुखवटा लावून वावरत असल्याचा आरोप केला. यानंतर एकमेकांचे हे खोटे मुखवटे काढण्यासाठी एक टास्क देण्यात होता. यावेळी राहुल वैद्यने एजाज खान आणि निक्की तंबोलीवर आरोप केले. नैना सिंहने देखील एजाज खानचे नाव घेतले. शार्दुल पंडितने जान कुमार सानू खोटेपणा करत असल्याचा आरोप केला. एजाज खानने जास्मीन भसीन, पवित्रा पुनिया आणि अभिनव शुक्ला यांचे नाव घेतले. तर, जान कुमार सानूने रुबिना आणि कविताने राहुलचे नाव या टास्कमध्ये नॉमिनेट केले.
एजाज खान सगळ्यांच्या निशाण्यावर
एजाजवर चिडलेल्या पवित्राला सलमानने चांगलेच बोल सुनावले. कविताचे एजाजशी असलेले वागणे आवडले नाही तर, तू एजाजशी तसेच का वागलीस?, असा प्रश्न सलमानने तिला विचारले. सलमान खानने पवित्राला चुकीचे ठरवत, तिला चांगलेच खडे बोल सुनावले. चिडलेल्या पवित्राने एजाजला धक्का मारला होता.याशिवाय तिने त्याला बरेच काही सुनावले देखील होते. तर, हे सगळे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप सलमानने पवित्रावर केला (Bigg Boss 14 Latest Update Salman Khan in Weekend ka vaar).
यावेळी पुन्हा एकदा त्याच्या भांडणाचा व्हिडीओ लावण्यात आला होता. पवित्राने आपल्याला एजाजची मागायची आहे असे म्हटले. तर, घरातील इतर स्पर्धकांनी पवित्राला न रोखल्यामुळे त्यांनाही यावेळी सलमानच्या रागाला सामोरे जावे लागले.
सलमानकडून राहुलचे कौतुक, घरातल्यांचा अभिनववर विश्वास
सगळ्यांनाच रागे भरत असलेल्या सलमानने मात्र, राहुल वैद्यचे कौतुक केले. तर, राहुलचे कौतुक करताना त्याने निक्की तंबोलीला खडे बोल सुनावले. एका टास्क दरम्यान निक्कीने केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे चिडलेल्या सलमानने निक्कीला बरेच प्रश्न केले. यावर शांत बसलेल्या निक्कीला, वागण्याच्या मर्याद्या बाळगण्याचा सल्ला सलमानने दिला (Bigg Boss 14 Latest Update Salman Khan in Weekend ka vaar).
यावेळी अभिनव आणि पवित्रा यांच्यादरम्यान एक टास्क झाला. या दोघांपैकी सगळ्यात जास्त विश्वासू कोण?, हे स्पर्धकांना निवडायचे होते. यावेळी सगळ्यांनी अभिनवचे नाव घेतले. तर, दुसरीकडे सगळ्यात कमी मते मिळाल्याने नैना सिंहला ‘बिग बॉस’चे घर सोडावे लागले.
#NainaSingh ka hua aaj elimination. RT if you loved her #BiggBoss14 journey.#BB14 #BiggBoss2020 @BeingSalmanKhan #WeekendKaVaar pic.twitter.com/4S2tw34jy4
— COLORS (@ColorsTV) November 8, 2020
(Bigg Boss 14 Latest Update Salman Khan in Weekend ka vaar)