मुंबई : नुकताच आता एक बिग बॉस 17 चा प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो पाहून येणाऱ्या एपिसोडमध्ये धमाका होणार हे नक्कीच दिसतंय. बिग बॉस 17 चा व्हायरल होणारा प्रोमो पाहून लोक हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये आता अंकिता लोखंडे, सना आणि खानजादी यांना एक खास पावर मिळाल्याचे बघायला मिळतंय. यानंतर घरात मोठा हंगामा हा होताना दिसतोय. याचाच प्रोमो सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
बिग बॉस 17 मध्ये नुकताच अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामधील वाद टोकाला गेला. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने थेट ऐश्वर्या शर्मा हिचा क्लास काढला. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या शर्मा ही घरामध्ये सतत भांडणे करताना दिसत आहेत.
अंकिता लोखंडे, सना आणि खानजादी या मेरे ढोलना गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यानंतर बिग बाॅस थेट यांना पावर रेसमधून काही लोकांना बाहेर करण्याचा अधिकार देतात. यानंतर मेरे ढोलना गाण्यावरील डान्स संपल्यानंतर अंकिता लोखंडे ही सर्वात अगोदर ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, मुनव्वर यांना बोलावते.
त्यानंतर सना ही विक्की, ईशा आणि अभिषेक यांचे नाव घेते. त्यानंतर खानजादी तहलका, समर्थ आणि बाबू भैया यांचे नाव घेते. हे सर्व आता पावर रेसमधून बाहेर आल्याचे बघायला मिळतंय. यामुळे बिग बॉस 17 च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये मोठा धमाका होताना दिसणार हे नक्कीच आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात सतत वाद हे बघायला मिळत आहेत.
बिग बॉस 17 मध्ये नुकताच घरातील सदस्यांना राशन टास्क देण्यात आला. यावेळी दोन गटांमध्ये घरातील सदस्यांना विभागले गेले. यामध्ये टीव्ही विरोधात ओटीटी असा सामना बघायला मिळाला. मात्र, यामध्ये ओटीटीवाल्यांचे वर्चस्व हे बघायला मिळाले. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये अजून काय धमाके होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.