3.53 मिनिटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, Bigg Boss 17च्या स्पर्धकाची गर्लफ्रेंड नाझिला सीताशीचा…

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 चा फिनाले अवघा काही दिवस दूर आहे. या शोच्या विजेतेपदावर नाव कोरण्यासानठी सर्वच स्पर्धक तगडी मेहनत करत आहेत. नुकत्याच झालेल्या वीकेंड का वारमध्ये करण जोहरने हा शो होस्ट केला आणि या एपिसोडमध्ये त्याने मुनव्वरशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती.

3.53 मिनिटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, Bigg Boss 17च्या स्पर्धकाची गर्लफ्रेंड नाझिला सीताशीचा...
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 1:12 PM

Bigg Boss 17 : गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस 17’ हा शो प्रचंड चर्चेत आहे. आता या शोचा अंतिम भाग, फिनाले अवघे काही दिवस दूर आहे. हा शो जिंकण्यासाठी आणि बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्यासाठी सर्वच स्पर्धक कसून मेहनत करत आहेत. नुकताच या शोचा वीकेंड का वार पार पडला. ज्याचा होस्ट होता करण जोहर. त्याने या भागात अनेक मुद्यांवर चर्चा केली आणि मुनव्वर बद्दलही तो बोलला. तर दुसरीकडे, मुनव्वरची कथित एक्स गर्लफ्रेंड नाझिला सिताशीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून तिने अनेक बिग बॉसच्या घरात चर्चेत असलेल्या गोष्टींबद्दलही खुलासा केला.

नाव न घेताच साधला निशाणा

हे सुद्धा वाचा

नाझिला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 3.53 मिनिटाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून त्यामध्ये नाझिलाने अनेक खुलासे केलेत, नाव न घेताच तिने बिग बॉसमधील काही स्पर्धकांची शाळा घेतली. नाझिलाने आयेशा खान आणि मुनव्वर फारुकी यांना फटकारले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, तिच्या पर्सनल गोष्टींबाबत नॅशनल टेलिव्हिजनवर वक्तव्य केल्याबद्दल नाझिलाने आयेशावर आरोप लावला आहे. “ हे जे काही सुरू आहे ते मला मान्य नाही. पण, गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्या आहेत. हो, मी स्वतः माझ्या वैयक्तिक गोष्टी कोणाशी तरी शेअर केल्या होत्या. पण, त्या सगळ्या गोष्टी शेअर करताना मी खूप भावूक झाले होते. पण मी सांगितलेल्या त्या गोष्टी येत्या काही महिन्यांत नॅशनल टेलिव्हिजनद्वारे सर्वांसमोर असतील याची मला कल्पना नव्हती ” असं नाझिला म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Nazila Sitaishi (@nazilx)

टीआरपीसाठी हे सगळं चुकीचं आहे

नाझिला पुढे म्हणाली, “जर माझा हात हेतू असता, जर मला हे करायचे असतं (वैयक्तिक बाबींबद्दल बोलणं) तर मी स्वतःहूनच ते केलं असते. पण, मला हे करायचे नव्हतं. म्हणूनच मी कोणत्याही मुलाखतींना नकार दिला. (बिग बॉस) शोची ऑफर देखीर मी नाकारली. फक्त कारण माझ्या किंवा इतर कोणाच्याही पर्सनल गोष्टी या गोष्टी मनोरंजनासाठी किंवा TRP मिळावा म्हणून किंवा इतर गोष्टींसाठी वापरायची माझी इच्छा नाही. हे चुकीचे आहे. माझं नाव अशी ठिकाणी वापरलं जात आहे, त्या जागी स्वतःचा बचाव करण्यासाठी मी नाहीच आहे.” असंही नाझिलाने तिच्या व्हिडीओत नमूद केलं आहे.

मुनव्वरबद्दल काय म्हणाली नाझिला

मुनव्वरचे नाव न घेता नाझिला म्हणाली, “दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याविरुद्ध ज्या गोष्टी बोलण्यात आल्या त्या खर्‍या नाहीत. याचा अर्थ ते त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तीला घाबरतात. मला गमावण्याच्या भीतीने तो काही दिवसांपूर्वी रडत असताना त्याने हे सांगितले. त्याला माझ्यासोबत गोष्टी सुधारायच्या आहेत असेही तो म्हणाला. या शोमध्ये कधीही न येणार्‍या व्यक्तीला तो ओळखतो, ती म्हणजे नाझिला. मग तो स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याची गोष्ट बदलतो. मला वाईट माणसासारखं दाखवतात.” असंगी ती म्हणाली.

‘लॉक अप’ या शोदरम्यान ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोरासोबत मुनव्वरचं नाव जोडलं गेलं होतं. तिनेसुद्धा मुनव्वर याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लॉक अप या शोमध्ये अंजली आणि मुनव्वर जवळपास 72 दिवस एकत्र होते. नाझिला, आयेशा आणि अंजली या तिघींसोबतच्या नात्यावरून मुनव्वरची सोशल मीडियावर खिल्लीदेखील उडवली गेली होती. तर एकाच वेळी दोन मुलींना डेट करत असल्याचं आयेशाने म्हटलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.