सासूबाई.. कैकेयी बनू नका ! राखी सावंतने अंकिता लोखंडेच्या सासूला सुनावलं

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 चा हा सीझन बराच गाजतोय तो अंकिता लोखंडेमुळे. अंकिता आणि विकीची भांडण, तिच्या सासूची वक्तव्यं, याची बरीच चर्चा आहे. अंकिता -विकीमध्ये बरेच वाद होतात, तिची सासूही बिग बॉसच्या घरात आल्यावर तिला बरंच ऐकवून गेली. आता राखी सावंत अंकिताच्या सपोर्टसाठी मैदानात उतरली असून तिने अंकिताच्या सासूला खडे बोल सुनावले.

सासूबाई.. कैकेयी बनू नका ! राखी सावंतने अंकिता लोखंडेच्या सासूला सुनावलं
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 12:28 PM

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 चा हा सीझन अंकिता लोखंडेमुळे बराच गाजतोय. या शोचा फिनाले आता खूप जवळ आला असून विजेतेपदासाठी सर्वच स्पर्धकांनी कंबर कसली आहे. ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सगळे स्पर्धक कसून मेहनत करत आहेत. या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची भांडणं चव्हाट्यावर आली. अंकिताची सासू म्हणजेच विकी आईसुद्धा तिच्याविरोधात वक्तव्ये करताना दिसली. फॅमिली वीक झाल्यापासून बिग बॉसच्या घरात वाद सुरू आहेत. या शोमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडेची आई आली होती. ज्यामध्ये विकीच्या आईने अंकिताला अनेक गोष्टी सुनावल्या.

एवढंच नव्हे तर घराबाहेर पडल्यानंतर त्या अनेक मुलाखतींमध्ये अंकिताबद्दल बोलल्या. तिच्याबद्दल अनेक वक्तव्य केली. मात्र त्यानंतर अनेक जण अंकिताच्या सपोर्टसाठी मैदानात आले. रश्मी देसाई, रितेश देशमुख यांनी अंकिताला पाठिंबा दिला. आता ड्राम क्वीन राखी सावंत ही देखील अंकितच्या सपोर्टसाठी मैदानात उतरली आहे. राखीने इन्स्टाग्राम वर एक व्हिडीओ शेअर करत विकीच्या आईला म्हणजेच अंकिताच्या सासूला बरंच काही सुनावलं. मुलगा आणि सून यांच्यामध्ये बोलू नका, असंही तिने बजावलं. ‘सासूबाई, अंकिता आणि तिच्या घरच्यांशी चांगलं वागा, नाहीतर मी येतोय.’ असा इशारा राखीने दिला. एवढंच नव्हे तर ‘सास भी कभी बहू थी. नवरा-बायकोच्या नात्यात, भांडणात तुम्ही कशाला मधे पडताय ?’ असा सवालही राखीने अंकिताच्या सासूला विचारला.

हे सुद्धा वाचा

विकीच्या आईवर भडकली राखी सावंत

या व्हिडीओत राखी बरंच काही बोलली आहे. तिने विकीच्या आईला फटकारलही. व्हिडीओमध्ये राखी पुढे म्हणते – ‘ एकदा तुमच्या मुलाने, अंकिताचा, सुनेचा हात धरला ना आणि लग्न केलेना. मग तुम्ही त्यांच्या भांडणात मधे का पडतेस ? तुम्ही काय करताय ? शांतपणे बसा. खा, प्या, आनंद घ्या. तसंही अंकिताच ही (बिग बॉसची) ट्रॉफी जिंकणार आहे. बिग बॉस अंकिताच जिंकणार आहे, ही माझी भविष्यवाणी आहे. आमची मराठी मुलगी अंकिताच हा शो जिंकेल’ असंही राखी या व्हिडीओत म्हणाली. .

सूनेचा मान राखा

‘ ( अंकिता जिंकल्यावर) तेव्हा तर तुम्ही खूप खुश व्हाल ना. माझी सून जिंकली, माझी सून जिंकली असं म्हणाल. त्यामुळे आत्ता असं वागू नका, शांत रहा. मुलगा आणि सुनेच्या नात्यात, भांडणात ( तुम्ही) मधे पडू नका’, असा सल्ला राखीने विकी जैनच्या आईला दिला. ‘ आमच्या घरीही बरीच भांडणं व्हायची, पण माझी आई कधीच मधे पडली नाही , काहीच बोलली नाही. सूनेचा आदर करा, तिला सन्मान द्या. सुनेचा मान राखाल तर तुमच्या मुलींचाही (सासरी) मान राखला जाईल. आमचं सगळ्यांचं अंकितावर खूप प्रेम आहे, मला तर ती बहिणीसारखी आहे. मी घरी आले होते, तेव्हा तुम्हाला भेटले होते. तुम्ही इतक्या चांगल्या आहात, मला तर देवीसारख्या वाटायचात. मग आता अचानक अशा का झालात ? माताजी- कैकेयी बनू नका.. घर जोडून ठेवा, तोडू नका ‘ अशा शब्दांत राखी सावंतने अंकिताच्या सासूला सुनावलं.

अंकिताने ऑक्टोबर महिन्यात पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. तेव्हापासून या दोघांमध्ये सतत विविध कारणांवरून वाद होताना दिसत आहेत. मध्यंतरी विकीची आई घरात आल्यावर तिने अंकिताला बरंच काही सुनावलं. तिच्या घरच्यांनाही फोन केल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यावरूनही बराच वादंग माजला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.