Bigg Boss 18 : खंडाळा घाटात माझ्या एन्काऊंटरचा कट होता – बिग बॉसमध्ये कोणाचा गौप्यस्फोट ?
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे सदावर्तेदेखील हिंदी बिग बॉसमध्ये गेले असून धमाल करताना दिसत आहेत. . आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या गुणरत्न यांची एंट्री सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली. त्यांनी मविआ सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
बिग बॉस हिंदी या गाजलेल्या रिॲलिटी शोचा सध्या 18 वा सीझन सुरू असून पहिल्या दिवसापासूनच शो चर्चेत आहे. या शोमध्ये अनेकविध सेलिब्रिटी असून शिल्पा शिरोडकरसारखी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही सहभागी झाली आहे. मात्र या शोमध्ये सध्या चर्चेता विषय आहेत ते वकील गुणरत्न सदावर्ते. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे सदावर्तेदेखील हिंदी बिग बॉसमध्ये गेले असून धमाल करताना दिसत आहेत. . आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या गुणरत्न यांची एंट्री सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. मराठा आरक्षाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणामुळं चर्चेत आले आहेत. आता ते बिग बॉसमध्ये काय करतात, याची अनेकांना उत्सुकता आहे.
या शोच्या पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरातला महत्त्वाचा नियम मोडला होता. घरातला महत्त्वाचा एक नियम म्हणजे कोणत्याही स्पर्धकाला दिवसा झोपता येत नाही.घरातील लाईट्स सुरू असेपर्यंत कोणलााही झोपता येत नाही, पण एखादा स्पर्धक झोपलाच तर त्याला उठवण्यासाठी कोंबडा आरवल्याचा आवाज येतो. पण सदावर्तेंनी पहिल्याच दिवशी हा नियम मोडला. ते घरातील एका सोफ्यावर ढाराढूर झोपले होते, त्यामुळे सर्वांनी त्यांना उठवलं. पण ते काही उठले नाहीत. सदावर्ते उठत नसल्यानं बिग बॉसचा कोंबडा आरवला होता.
मविआच्या काळात माझा एन्काऊंटर करणार होते
दरम्यान बिग बॉसच्या घरात इतरांशी बोलताना, गप्पा मारताना सदावर्ते यांनी त्यांच्या कामाबद्दल सांगितलं, अनेक मोठे खुलासेही केले. मविआचं सरकार असताना खंडाळा घाटाता माझा एन्काऊंटर करणार होते, असा मोठा आरोप सदावर्ते यांनी केला . एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मला एन्काऊंटरसंदर्भात सांगितलं, असंही ते म्हणाले.
काय आहे सदावर्तेंचा दावा ?
बिग बॉसच्या घरात असलेल्या सदावर्ते यांनी ( तत्कालिन) महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
‘ मविआचं सरकार असताना खंडाळा घाटात माझं एन्काऊंटर करणार होते. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणात मला आरोपी करण्यात आलं होतं. त्याप्रकरणात मला जामीन मिळाला नव्हता, तेव्हा माझा एन्काऊंटर करणार होते’, असा आरोप सदावर्ते यांनी केला. ‘ मी जेलमध्ये असताना एक अधिकारी माझ्यावर खूप चिडायचा, मला अंडा सेलमध्येही टाकण्यात आलं होतं’, असं सदावर्ते म्हणाले.
‘ जामीन मिळाल्यानंतर मला जबाब नोंदवायला बोलावलं तेव्हा मला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, तुम्हाला लाईफ मिळाली आहे. खंडाळा घाटात तुमचा एन्काऊंटर होणार होता असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं’, असा दावाही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.