Bigg Boss 18 : मृत्यूच्या 8 दिवसांपूर्वींच सिद्धू मूसेवालाला मिळाला होता इशारा, बिग बॉस स्पर्धकाचा मोठा खुलासा

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस हिंदीचा 18 वा सीझन आता सुरू झाला आहे. तेजिंदर सिंह ग्गा हे या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. सध्या ते जेलमध्ये आहेत , मात्र जेलमध्ये असूनही ते एकसे एक किस्से सांगत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. त्याचदरम्यान त्यांनी दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला याच्यासंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे.

Bigg Boss 18 : मृत्यूच्या 8 दिवसांपूर्वींच  सिद्धू मूसेवालाला मिळाला होता इशारा, बिग बॉस स्पर्धकाचा मोठा खुलासा
सिद्धू मूसेवालाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 1:56 PM

अभिनेता सलमान खान होस्ट करणारा प्रसिद्ध रिॲलिटी शो बिग बॉसचा 18वा सीझन सुरू झाला आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये स्पर्धक एकमेकांशी भिडताना दिसले. घरातील स्पर्धक आणि त्यांच्यातील वाद पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. याच दरम्यान, भाजप नेते तेजिंदर सिंग बग्गा यांनी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या मृत्यूबाबत एक मोठं विधान करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जे ऐकून सर्वच जण हैराण झाले आहेत. सिद्धू मूसावाला याच्या मृत्यूपूर्वी एका ज्योतिषाने त्याला चेतावणी दिली होती, असे बग्गा यांनी म्हटले होते.

भाजप नेते तेजिंदर सिंग बग्गा बिग बॉस 18 मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. सध्या ते जेलमध्ये आहेत, पण विविध घटना, किस्से सांगत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्याचवेळी गप्पा मारताना ते सिद्धू मूसावालबद्दल बोलत होते. ते म्हणाले, की आधी माझा ज्योतिषावर विश्वास ठेवायचो नाही. पण सिद्धू मूसावालाच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्योतिषावर पूर्ण विश्वास बसला. माझ्या एका मित्राने सिद्धू मीसावाला याला मृत्यूपूर्वी 8 दिवस आधी इशारा दिला होता आणि देश सोडून जायला सांगितलं होतं, असं बग्गा म्हणाले. मात्र त्यानंतर 8 दिवसांतच त्याची हत्या झाली, असेही ते म्हणाले.

मृत्यूच्या 8 दिवस आधी मिळाला होता इशारा

तेजिंदर सिंग बग्गा यांनी दावा करताना म्हटलं की, माझा एक मित्र आहे रुद्र, तो ज्योतिषी आहे. 19 मे 2022 रोजी मी त्याच्यासोबत भाजपच्या दिल्ली कार्यालयात बसला होतो. तेव्हा रुद्रचा एक फोटो पाहिला, ज्यात तो सिद्धू मुसेवालासोबत होता. मी त्यावा विचारलं की तू याला कसं ओळखतोस ? मग त्याने त्यांना संपूर्ण किस्सा सांगितला. तो म्हणाला की मूसवालाला मी भेटलो. त्याचं भविष्य सांगायला गेलो होतो. रुद्रने सिद्धूला देश सोडण्याचा सल्ला दिला. एखाद्याच्या जीवाला धोका आहे, असं थेट सांगता येत नाही, पण मी त्याला देश सोडून जाण्यास सांगितलं होतं. पण त्यानंतर 8 दिवसांतच त्याच्या हत्येची बातमी आली, असं रुद्रने मला सांगितलं, असं बग्गा यांनी नमूद केलं .

सिद्धू मूसेवालाची हत्या

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याचा 29 मे 2022 रोजी निधन झाले. तो कारमधून जात असताना, तेव्हा अचानक दोन कारमधील लोकांनी त्यांची कार थांबवली आणि अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. बिष्णोई टोळीच्या गोल्डी ब्रारने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली होती.

निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार.
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा.
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा.
अजित पवार मुखात? शरद पवार मनात? समर्थक संभ्रमात? दादा नेते अन् साहेब..
अजित पवार मुखात? शरद पवार मनात? समर्थक संभ्रमात? दादा नेते अन् साहेब...
विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कस जिंकल हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?
विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कस जिंकल हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?.