Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharmishtha Raut | ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा

लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाल्याने नाशिकमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने साखरपुडा केला. (Bigg Boss Marathi Actress Sharmishtha Raut Engagement)

Sharmishtha Raut | 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 2:52 PM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. तेजस देसाईसोबत साखरपुडा झाल्याची माहिती शर्मिष्ठाने सोशल मीडियावर दिली आहे. (Bigg Boss Marathi Actress Sharmishtha Raut Engagement)

शर्मिष्ठाचा साखरपुडा एप्रिल महिन्यात होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकलला गेला. काही नियम शिथिल झाल्याने नाशिकमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत तिने साखरपुडा केला. इगतपुरीच्या रिसोर्टमध्ये हा समारंभ झाला.

शर्मिष्ठाने एक छान पोस्ट लिहित आपली प्रेमकहाणी सांगितली आहे. ‘पराभवाच्या नाही, तर आयुष्यात प्रत्येक क्षणी अलगद मिठीत घेणारा, कायम मी आहे याची पावला पावलाला जाणीव देणारा, माझा तो, माझा स्वप्नातला राजकुमार मला भेटलाय” असं तिने यामध्ये लिहिलं आहे. विशेष म्हणजे तेजसनेही आपल्या भावना अशाच पद्धतीने शब्दबद्ध केल्या आहेत.

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सध्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ‘संयोगिता’ची भूमिका साकारात आहे. याआधी तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘उंच माझा झोका’ अशा मालिका केल्या आहेत. ‘आज काय स्पेशल’ या कुकरी शोचे सूत्रसंचालनही ती करत होती, मात्र तिला खरी ओळख मिळाली. ‘बिग बॉस मराठी’मुळे. पहिल्या पर्वात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्री घेणाऱ्या शर्मिष्ठा राऊतने थेट फायनलपर्यंत मजल मारली होती.

View this post on Instagram

My time… My love

A post shared by Tejas Desai (@tejas.desai.1044) on

(Bigg Boss Marathi Actress Sharmishtha Raut Engagement)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.