Janhavi Killekar : तू फक्त एक हाक मार, मी… जान्हवी सूरज चव्हाणला असं का म्हणाली ?

बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते.भाऊबीजेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली. भाऊबीजेनिमित्त तिने पती आणि मुलासह सूरजची स्पेशल भेट घेतली. त्यांच्या या खास भेटीच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव झालाय.

Janhavi Killekar : तू फक्त एक हाक मार, मी... जान्हवी सूरज चव्हाणला असं का म्हणाली  ?
जान्हवी-सूरजची भाऊबीजImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 2:38 PM

‘बिग बॉस मराठी’चा 5 वा सीझन संपून आता महीना उलटत आलाय. या घरातले सगळेच स्पर्धक खूप गाजले, त्यातील अनेकांचं एकमेकांशी पटलं नाही. पण घराबाहेर आल्यावर हे स्पर्दक एकमेकांचे चांगले मित्र बनलेले दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा हा सीझन जिंकणारा सूरज चव्हाण हा तसा सर्वांचाच लाडका, त्याचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पॅडी, अंकिता, डीपी, निक्की यांच्यासह त्याचं जान्हवीसोबतही खूप जमलं. रक्षाबंधनाच्या दिवशी घरात असताना सूरज आणि जान्हवीने राखीचा हा सण साजरा केला होता. तेव्हाच आपण एकत्र भाऊबीज करायची असंच सूरजने जान्हवीला सांगितलं होतं.

जान्हवीने पूर्ण केलं तिचं वचन

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांचं नातं असंच छान राहिलं होतं, काही दिवसांपूर्वीच जान्हवीने सूरजच्या गावी जाऊ त्याची भेट घेतली होती. त्यानंतर आता दिवाळीत, भाऊबीजेच्या निमित्ताने ती पुन्हा त्याच्या घरी पोहोचली. भाऊबीजेला पुन्हा येईन असा शब्द तिने दिला होता, तिचं ते वचन जान्हवीने खरं केलं. भाऊबीजेच्या दिवशी, जान्हवी ही तिचे पती आणि मुलासह पुन्हा सूरजच्या घरी गेली होती. त्यांच्या या भेटीचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.

तू फक्त एक हाक मार मी कायम तुझ्यासोबत आहे

जान्हवीने सूरजच्या गावी जात त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला. जान्हवीला पाहताच सूरजही खूप खुश झाला, त्याने तिला घट्ट मिठी मारली. यावेळी जान्हवीसोबत तिचे पती किरण आणि मुलगा इशानही होते. या भेटीचे सुंदर फोटो शेअर करताना जान्हवीने तेवढीच सुंदर कॅप्शनही लिहीली आहे. ‘तू फक्त एक हाक मार मी कायम तुझ्या सोबत आहे♥️’अशा शब्दांत जान्हवीने ही कॅप्शन लिहीली असून त्या फोटोंमध्ये तिच्या आणि सूरजच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या निखळ हास्यातून दिसत आहे.

दिवाळीनिमित्त घेतलं खास ब्रेसलेट

दिवाळीनिमित्त जान्हवीने तिच्यासाठी खास इव्हिल आय, असलेलं ब्रेसलेट घेतलं, त्याचा व्हिडीओ तिने शेअर करत आपल्यासाठी हे बिग बॉसचं साईन असलेलं ब्रेसलेट असल्याचं नमूद केलं होतं.त्यावर लाईक करत अनेकांनी तिला तू सूरजसोबत भाऊबीज साजरी करणार की नाही असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी तिने जाणार आहे, असं नमूद केलं होतं.दिलेला शब्द खरा करत जान्हवीने पती, मुलासोबत सूरजचं गाव गाठलं आणि त्याच्यासोबत भाऊबीजही साजरी केली.

जान्हवीने निभावलं खरं नातं

त्यांचे हे विविध फोटो, त्यांच हास्य पाहून चाहतेही सुखावलेत. जान्हवीच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडलाय. ‘ बहिणीच खरं नातं तर जानवी ने निभवले आहे अंकिता सारख म्हणून नाही दाखवले करून दाखवले आहे’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘ काही बोला पण अंकिता पेक्षा सूरज ची काळजी घेते जान्हवी 😍’ असंही दुसऱ्या युजरने लिहीलं. ‘दोघांची जोडी भारी आणि अशी राहूदे कायमस्वरूपी’, अशा शुभेच्छाही एका युजरने दिल्यात. ‘ तुझं वरवरलं प्रेम नाही खरोखर मनापासून सूरज❤️🔥वर प्रेम करतेस बहिण भावाच नातं असं असावं’, अशा शब्दांत आणखी एका युजरने जान्हवीचं कौतुक केलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.