Bigg Boss Marathi 5 : भाऊ इज बॅक ! रितेश देशमुखची बिग बॉसमध्ये पुन्हा एंट्री , ग्रँड फिनालेआधी देणार मोठा धक्का

Bigg Boss Marathi 5 Grand Finale : बिग बॉस मराठीचा सीझन 5 चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला होस्ट रितेश देशमुखही आता परत येणार असून त्याचा शानदार प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 5 : भाऊ इज बॅक ! रितेश देशमुखची बिग बॉसमध्ये पुन्हा एंट्री , ग्रँड फिनालेआधी देणार मोठा धक्का
रितेश देशमुखची बिग बॉसमध्ये पुन्हा एंट्रीImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 2:36 PM

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . गेल्या 70 दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरजन करणारा बिग बॉस मराठी हा शो आता शेवटच्या टप्प्यावर आला असून लवकरच तो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या रविवारी म्हणजे 6 ऑक्टोबरला या शोचा ग्रँड फिनाले होणार असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. काल या शो मधून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना बाहेर पडावे लागले असून शो मधील सुपर 6 सापडले आहेत. मात्र ग्रँड फिनालेपूर्वी टॉप 6 पैकी आणखी एक सदस्य बाहेर पडणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शोचा होस्ट, रितेश देशमुख या कार्यक्रमातून गायब आहे. रितेशने शो सोडला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.

मात्र आता रितेश देशमुख हा भाऊचचा धक्का घेऊन परतणार आहे. त्याची शोमध्ये पुन्हा एंट्री होणार आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला असून त्यात रितेश देशमुखचा आवाज ऐकू येत आहे. या शोचा ग्रँड फिनाले, कधी आणि किती वाजता होणार आहे हे तो सांगतोय. एवढंच नव्हे तर खेळ अजून संपलेला नसून ग्रँड फिनाले पूर्वी स्पर्धकांना आणखी मोठा धक्का बसणार आहे, असंही रितेश सांगताना दिसतोय.

रितेशच्या आवाजात ग्रँड फिनालेची घोषणा

‘ चक्रव्यूह भेदून आता मिळाले आहेत या सीझनचे सुपर 6 , पण खेल अजून संपलेला नाहीये मित्रांनो.. कारण या सुपर सहांना मिळणार आहे या सीझनचा सगळ्यात मोठा धक्का! तेव्हा न चुकता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पहा 6 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजता’अशी घोषणा या प्रोमोमध्ये रितेशच्या आवाजात करण्यात आली आहे. प्रोमोच्या शेवटी तो स्टेजवर एंट्री करतानाही दिसतो. गेल्या काही दिवसांपासून  रितेश देशमुख या कार्यक्रमातून होता, बरेच दिवस तो दिसला नव्हता. त्यामुळे रितेशने ग्रँड फिनालेपूर्वीच बिग बॉस हा शो सोडला की काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. पण आता या प्रोमोमुळे रितेश देशमुख पुन्हा परतल्याचे दिसत असून ग्रँड फिनालेसाठी सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

हे आहेत सुपर 6 स्पर्धक

बिग बॉसच्या या सीझनची लोकांमध्ये मोठी क्रेझ पहायला मिळाली. अखेर या सीझनच्या अंतिम टप्प्यात शोला त्याचे सुपर 6 फायनलिस्ट मिळाले आहेत. अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरात उरले आहेत. काल वर्षा उसगांवकर बाहेर पडल्यावर अनेकांना धक्का बसला. आता हे सहा स्पर्धक शेवटच्या टप्प्यात उरले असून आजच्या एपिसोडमध्ये यांच्यापैकी आणखी एक सदस्य घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण आज बिग बॉसच्या प्रोमोमध्ये लवकरच शोला टॉप 5 सदस्य मिळणार असं दाखवण्यात आलं. त्यामुळे आणखी कोणता सदस्य घराचा निरोप घेतो आणि टॉप 5 कोण राहतात याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यांच्यापैकी एक जणच रविवारी जिंकेल आणि बिग बॉसची ट्रॉफी त्याला मिळेल.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.