Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचं दिवाळीचं खास गिफ्ट, “BIGG BOSS” चं स्पेशल ब्रेसलेट पाहिलं का ? Video व्हायरल

बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन संपून महीना होत आला तरी या शोमधील अनेक स्पर्धक अजूनही चर्चेत आहे. सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, यांच्यासोबतच जान्हवी किल्लेकरही प्रचंड चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूपच ॲक्टिव्ह आहे. तिच्या विविध पोस्ट्स , व्हिडीओवरं लाईक्सचा , कमेंट्सचा पाऊस पडतो.

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचं दिवाळीचं खास गिफ्ट, BIGG BOSS चं स्पेशल ब्रेसलेट पाहिलं का ? Video व्हायरल
जान्हवी किल्लेकरचं दिवाळीचं खास गिफ्टImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 1:47 PM

बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन संपून महीना होत आला तरी या शोमधील अनेक स्पर्धक अजूनही चर्चेत आहे. सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, यांच्यासोबतच जान्हवी किल्लेकरही प्रचंड चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूपच ॲक्टिव्ह आहे. तिच्या विविध पोस्ट्स , व्हिडीओवरं लाईक्सचा , कमेंट्सचा पाऊस पडतो, काही दिवसांपूर्वीच तिने दिवाळीत सासूबाईंचे पाय धुतल्याचा, त्यांची पूजा केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. संस्कारी सून म्हणत नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं होतं. ही दिवाळी जान्हवीसाठी खास आहे. आणि त्याच सणानिमित्त तिने बिग बॉसच्या आठवणींना उजाळा देत स्वत:साठी एक खास खरेदी केली. त्याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे. काय आहे तिचं गिफ्ट ?

विकत घेतलं खास ब्रेसलेट

हे सुद्धा वाचा

जान्हवीने काल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पेशल व्हिडीओ शेअर करत तिच्या खास गिफ्टची सगळ्यांना झलक दाखवली. यामध्ये सर्वप्रथन तिने सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिल्यात. आणि हा व्हिडीओ बनवण्यामागचं कारणही तिने शेअर केलं. ‘ काल पाडव्याच्या निमित्ताने मी स्वत:साठीच एक छान गिफ्ट घेतलं आहे. ते छोटसं आहे, पण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे’ असं सांगत जान्हवीने त्या गिफ्टची झलक दाखवली. एका हिरव्या रंगाचा व्हेल्वेट बॉक्स उघडून तिने त्यातलं स्पेशल ब्रेसलेट दाखवलं. त्यामध्ये एक सोन्याचं ब्रेसलेट होतं, त्याच्या मध्यभागी इव्हिल आय दिसलं.

बिग बॉस माझ्यासाठी महत्वाचे

जान्हवीने ते ब्रेसलेट सर्वांना दाखवलं. ‘ हे खरंतर इव्हिल आय आहे. पण माझ्यासाठी हे बिग बॉसचं साईन आहे.बिग बॉस माझ्या आयु्ष्यात खूप महत्वाचे आहेत. कारण आज मी जे काही आहे ते बिग बॉसमुळेच आहे. सो आता मी असं ठरवलं आहे की बिग बॉसच्या नावाचं ब्रेसलेट मी आता हातात घालणार आहे. काल स्पेशली जाऊन मी हे बिग बॉसचं ब्रेसलेट विकत घेतलंय’ असं जान्हवीने सांगितलं. तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं हे ब्रेसलेट ते कमेंटमध्ये सांगा, असं आव्हानही तिने चाहत्यांना केलं.

चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस

तिचा हा व्हिडीओ आणि हे नवं ब्रेसलेट तिच्या चाहत्यांना खूप आवडलंय. त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा दिल्या आहेत. ‘ दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान ब्रेसलेट आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला खूप सहकार्य लाभले त्या बिग बॉसचे ब्रेसलेट बनवले खूप छान वाटलं’, अशी कमेंट एकाने केली. ‘ हे ब्रेसलेट आणि तू दोघेही मस्त आहात’, अशी कमेंटही दुसऱ्याने केली.

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.