Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jahnavi Killekar : म्हणून मी ते 9 लाख घेतले… जान्हवीने सांगितलं ‘पैशांची’ बॅग उचलण्याचं कारण !

बिग बॉस मराठी मध्ये तिच्या वागण्यामुळे चर्चेत असलेली जान्हवी किल्लेकर ग्रँड फिनालेमध्येही भाव खाऊन गेली. सुपर 6 मध्ये असलेली जान्हवी ग्रँड फिनालेमध्ये सर्वात पहिले बाहेर पडली. पण जाताना चक्क 1-2 नव्हे तर तब्बल 9 लाख रुपये घेऊन गेली. बिग बॉसनं दिलेली 9 लाखांची बॅग तिने उचलली आणि ती शोच्या बाहेर आली

Jahnavi Killekar : म्हणून मी ते 9 लाख घेतले... जान्हवीने सांगितलं 'पैशांची' बॅग उचलण्याचं कारण !
जान्हवी किल्लेकरने का उचलली पैशांची बॅग ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 11:19 AM

बिग बॉस मराठी सीझनचा 5 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बारामतीच्या सूरज चव्हाणने हा शो जिंकत बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर अभिजीत सावंत हा रनर अप ठरला. हा शो संपताच सध्या सगळीकडे सूरज चव्हाणचीच चर्चा आहे. पण त्याच्यासोबतच घरातले इतर स्पर्धकही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आणि चर्चेतही. त्यांचं मानधन, कोणाला किती पैसे मिळाले याचीही लोकांमध्ये चर्चा होत आहे. हा शो गाजवणाऱ्या स्पर्धकांमध्ये जान्हवी किल्लेकरचं नाव अग्रस्थानी आहे. संपूर्ण शोमध्ये तिच्या वागण्यामुळे चर्चेत असलेली जान्हवी ग्रँड फिनालेमध्येही भाव खाऊन गेली. सुपर 6 मध्ये असलेली जान्हवी किल्लेकर ग्रँड फिनालेमध्ये सर्वात पहिले बाहेर पडली. पण जाताना चक्क 1-2 नव्हे तर तब्बल 9 लाख रुपये घेऊन गेली. बिग बॉसनं दिलेली 9 लाखांची बॅग तिने उचलली आणि ती शोच्या बाहेर आली. तिच्या या निर्णयाचं बऱ्याच जणांकडून कौतुक होत आहे. शोच्या बाहेर आल्यावर आता खुद्द जान्हवीनेच या निर्णयामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं.

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत एक टास्क पार पडला. यावेळी सहाही स्पर्धकांना एक ऑफर देण्यात आली. सर्व स्पर्धकांना गेम सोडण्यासाठी 7 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. 6 जणांपैकी कोणी एकाने गेम सोडला तर त्याला 7 लाख रुपये मिळतील, अशी ऑफर देण्यात आली. पण सर्व स्पर्धकांनी ती ऑफर नाकारली. यानंतर बिग बॉसने या टास्कमध्ये आणखी एक ट्विस्ट आणला. बिग बॉसने आणखी 2 लाख रुपये वाढवत जो स्पर्धक पळत जाऊन बझर वाजवेल तो स्पर्धक 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडेल, असं जाहीर केलं. बिग बॉसची ही ऑफर ऐकल्यानंतर जान्हवी आपल्या जागेवरुन उठली आणि बझरच्या दिशेने गेली. तिने पैसे स्वीकारत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी ती इमोशनलही झाली होती. अखेर तिने 9 लाख रुपयांची बॅग उचलली आणि घराबाहेर आली.

जान्हवीने पैसे स्वीकारण्याच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक तर केलं मात्र तिने हा निर्णय का घेतला , त्यामागचं कारण काय असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. अखेर एका मुलाखतीत खुद्द जान्हवीनेच या निर्णयाचा खुलासा केला.

मी तेव्हा पैशांची बॅग उचलली नसती तर..

बिग बॉसच्या बाहेर आल्यावर स्पर्धकांच्या अनेक मुलाखती सध्या सुरू आहेत. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जान्हवीने बिग बॉसमधील तिच्या प्रवासाबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच ग्रँड फिनालेमध्ये 9 लाखांचीलती बॅग घेण्यामागचं कारणही तिने सांगितलं. ” ( पैशांची बॅग उचलली) मी तेव्हा रडायलाच आले होते. पण रितेश सरांनी जेव्हा एन्व्हलप उघडलं, त्यात माझचं नाव आहे हे कळलं आणि ते ऐकन माझ्या जीवात जीव आला. जर मी ते पैसे उचलले नसते, तर मी बाहेर जा ताना काय घेऊन गेले असते ? शून्य ! हातात काहीच आलं नसतं. बाहेर पडताना काय घेतलं जान्हवीने ? काहीच नाही ! असं झालं असतं. सो, मी ते पैसे उचलले नसते तर मला खूप मोठं गिल्ट आलं असतं, ” असं जान्हवी म्हणाली.

” आणि ती संधी बिग बॉसने दिली होती, त्यात काहीतरी तर असेलच ना. ते पैसे काही चोरी करायचे नव्हते, ते सगळ्या सदस्यांच्या हक्काचे पैसे होते. ( ते पैसे घेण्यासाठी) बिग बॉसने सगळ्यांना चान्स दिला होता. उचला कोणाला उचलायचे आहेत ते, ते पैसे मी उचलले ” असंही जान्हवीने नमूद केलं.

लोक पुन्हा ट्रोल करतील…

” जेव्हा सात लाखांसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी विचार करत होते. मानत आलं की आता लोक परत ट्रोल करणार. पण खरं सांगू का ? आम्ही आत जरी असलो ना तरी दिसत होतं की टॉप थ्री कोण आहे. मला असं वाटलं की मी बिग बॉसमध्ये असताना लक्षात राहिले, पण जाता जाता सुद्धा लक्षात राहिले पाहिजे लोकांच्या, असा विचार मनात होता. वेगळं काय करू शकतेस ? वेगळं केलं पाहिजे काहीतरी. टॉप थ्री मला माहीत होते, चौथी येऊन काय मिळणार होतं ? काही नाही मिळणार. म्हणून मी विचार केला आणि ती ( पैशांची) बॅग उचलली. बझर दाबला, मनात जे खरंकारण होत , ते सांगितलं. खर बोलले मी. माझ्या चुका एवढ्या झाल्यात की महाराष्ट्र एवढ्या लवकर स्वीकारेल, माफ करेल असं नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत, माझी चूक झाली आहे. त्यामुळे हे सगळं ठीक व्हायला थोडा वेळ जाईल, लगेच काही होऊ शकत नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात शेवटचं प्रायश्चित म्हणून मी माझं नाव शोमधून काढते, माघार घेते, असं म्हणून मी बझर दाबला ” असं जान्हवीने प्रांजळपणे सांगितलं.