Bigg Boss 18 : एका दिवसात अडीच किलो चहा पावडर, 90 लीटर दूध… सलमानच्या शोचं बजेट ऐकाल तर…

बिग बॉस हिंदीचा 18 वा सीझन लवकरच सुरू होत आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी सलमान खानची फी आणि शोच्या बजेटबद्दल चर्चा सुरू होते. पण बिग बॉसच्या सेटवर एका दिवसात किती दूध आणि चहा पावडर वापरली जाते, है वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

Bigg Boss 18 : एका दिवसात अडीच किलो चहा पावडर, 90 लीटर दूध... सलमानच्या शोचं बजेट ऐकाल तर...
बिग बॉसचा नवा सीझन लवकरच सुरू होत आहे.
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 11:40 AM

बिग बॉस हिंदीचा 18 वा सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. याचा आणखी एक अर्थ म्हणजे आता सर्वांचा लाडका भाईजान, सलमान खान दर आठवड्याला दिसणार. हा शो फॉलो करणारे निम्मे लोक तर सलमानसाठी शो पाहतात. पण बऱ्याच वेळा सलमान खान, या शो चा सेट , त्यातील स्पर्धक आणि बिग बॉसबद्दल चर्चा होत असते. मात्र या शोच्या मागे कोम मेहनत करतं, ते काम कसं होतं, सेटवर काय तयारी करण्यात येते,हे फार कमी लोकांना माहीत असतं. आज त्याबद्दलचं जाणून घेऊया.

साधारणपणे एखाद्या घरात एक किलो चहा पावडर महिन्यापेक्षा जास्त काळ पुरते. पण एका रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या सेटवर किती दूध आणि चहाची पाने वापरली जातात हे सांगण्यात आले आहे.रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या सेटवर फक्त क्रू मेंबर्ससाठी एका दिवसात अडीच किलो चहा पावडर वापरली जाते. एवढेच नव्हे तर चहा बनवण्यासाठी एका दिवसात 80 ते 90 लिटर दूध वापरले जाते. एका जुन्या रिपोर्टमध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र आता त्यात काही बदल झालेले असू शकतात.

चहाच्या खर्चात अनेक शोचं बजेट बसेल

रिपोर्ट्सनुसार, या शोच्या प्रोजेक्ट हेडच्या सांगण्यानुसार, सेटवर चहा-पाण्यासाठी जितका खर्च होतो, त्या बजेटमध्ये तर छोटे-मोठे शो आरामात बनू शकतात. पण त्यावर नक्की किती रक्कम खर्च होते, हे मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. दरवर्षी बिग बॉस शो बाबत जोरदार चर्चा सुरू असते. हा शो सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत जितके पैसे खर्च होतात, तेवढ्या रकमेत तर मोठ्या बजेटचे 4-5 चित्रपट नक्की बनू शकतात, असेही म्हटले जाते.

6 ऑक्टोबरला सुरू होणार शो

सलमान खानच्या फीबाबत नेहमी ऐकायला मिळते की, यावेळी त्याने त्याची फी वाढवली आहे. सलमान प्रत्येक एपिसोडनुसार पैसे चार्ज करतो. बिग बॉस हिंदीचा 18 वा सीझन आता सुरू होणार असून रविवारी, 6 ऑक्टोबरला त्याचे ग्रँड ओपनिंग आहे. या शोमध्ये नक्की कोण कणो सहभागी होणार, याची उत्सुकता लोकांना असून सलमान खान त्यांच्या नावांची घोषणा करणार आहे.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.