Sooraj Chavhan : अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सूरज चव्हाणची मोठी घोषणा
बिग बॉस मराठीचा हा 5 वा सीझन गाजवणारा आणि विजेतेपदावर नाव कोरणारा सूरज चव्हाण हादेखील खूप लोकप्रिय आहे. सूरज चव्हाण हे सोशल मीडियावर चर्चेत असलेले एक नाव आहे. त्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.
बिग बॉस मराठी सीजन 5 चे पर्व ऑक्टोबर महिन्यात संपलं खर पण त्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांची आजही चर्चा होत असते. बिग बॉस मराठीचा हा 5 वा सीझन गाजवणारा आणि विजेतेपदावर नाव कोरणारा सूरज चव्हाण हादेखील खूप लोकप्रिय आहे. सूरज चव्हाण हे सोशल मीडियावर चर्चेत असलेले एक नाव आहे. त्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असलेला सूरज बिग बॉसपासून बराच चर्चेत आलेला आहे. तुटलेली चप्पल आणि अवघे दोन- तीन जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात आलेल्या सूरजचा अंदाज पहिल्यापासूनच लोकांना आवडला होता. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या फायनलमध्ये पोहोचले. सर्वात जास्त मत पडल्याने सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झाला.
मात्र ही स्पर्धा जिंकल्यानंतरही त्याचा साधेपणा अजूनही कायम असून तेच चाहत्यांना खूप आवडतं. मूळचा बारामतीचा असलेल्या सूरजनं बिग बॉस जिंकल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यसाठीच सूरज चव्हाणे पुन्हा त्यांची भेट घेतली. अन् यावेळी त्यावेळी त्याने एक मोठी घोषणाही केली.
सूरजने घेतली अजितदादांची भेट
सूरज चव्हाण हा थेट अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचला, त्याने त्यांच्यासाठी खास भेटही आणली होती. दोघांमध्ये काही वेळा गप्पा रंगल्या. यावेळी अजित पवार यांनी सूरजच्या घरासंदर्भातही अपडेट घेतली आणि पुढील 9 महिन्यात सूरज याचं घर पूर्ण होईल असं आश्वासन देखील यावेळी अजित पवार यांनी सूरजला दिलं. त्यांच्या या भेटीवेळी सूरज खूप आनंदी दिसला.
दादा तर देव माणूस
अजित दादांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला कधीपासून त्यांना भेटायचं होतं, त्यांच्या भेटीसाठी मी आतूर झालो होतो. अखेर आज ही भेट झालीच. त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आलो होतो, असं सूरजने सांगितलं. ( माझ्या) घराचं पूर्ण काम जोरात सुरू आहे, देव माणूस आहेत दादा अशा शब्दांत त्याने अजित पवारांचे कौतुक केलं. मी आज त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी माझं घर बांधणाऱ्या कंत्राटदाराला फोन केला होता. 9 महिन्यात घर बांधून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. दादांचा शब्द आहे तो, तो शब्द ते पूर्ण तर करणारंच.
सूरजने केली मोठी घोषणा
बिग बॉसचं विजेतेपद मिळाल्यानंतर सूरज सोशल मीडियावर तर ॲक्टिव्ह असतो, पण त्याचं पुढचं काम काय, तो कधी दिसणार असा सवाल त्याच्या चाहत्यांच्या मनात नेहमी असतो. याचसंदर्भात आता सूरजने मोठी घोषणा केली आहे. माझी मोठमोठी काम सुरू आहेत, आता झापूक झुपूक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तेव्हा भेटूच आपण, असं खुद्द सूरजनेच सांगितलं.