सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

“रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 1:19 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सुशांतचे वडील के के सिंह यांनीच त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर रियाने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी केली आहे. (Bihar Police in Mumbai to inquiry Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Death Case)

मुंबईतील सांताक्रुझमध्ये असलेल्या रियाच्या घरी बिहार पोलिस जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रियाने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनाची तजवीज केली आहे. रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करु शकते. यासंदर्भात तिने वकील सतीश मानशिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बिहारमध्ये पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. “रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी पाटणा पोलिसांना याबाबतची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सुशांतच्या वडिलांचे पाटण्यात दोन मोठे आरोप

1. रियाने सुशांतच्या खात्यातून तब्बल 15 कोटी रुपये अशा एका खात्यात वळते केले, ज्याच्याशी सुशांतचं काही देणं घेणं नव्हतं.

2. रियाने सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांसाठी त्याचा वापर केला.

“रियाने सुशांतला फसवलं. तिने त्याच्याकडून पैसे घेतले. तसेच त्याला कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे केले. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असे सुशांतचे वडील म्हणाले. या तक्रारीनुसार रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियावर कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

पाटणा पोलीस याबाबत क्रॉस वेरिफिकेशन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना सगळ्यात आधी मुंबईतील नोडल ऑफिसर डीसीपी क्राईम ब्रांचची परवानगी घ्यावी लागणार.

हेही वाचा : धर्मा प्रॉडक्शन्स आणि सुशांतमध्ये कुठलाही वाद नाही, चौकशीत अपूर्व मेहतांनी सर्व आरोप फेटाळले

केस डायरी, 37 जणांचे जबाब पाहावे लागणार, रियाला आणि तिच्या कुटुंबियांना ताब्यात घेण्यापूर्वी मुंबई पोलिसांकडून महिला पोलिसांची मागणी करावी लागणार. जा खात्यात 15 कोटी रुपये ट्रान्सफर झाले, त्या खात्याची चौकशी पाटणा पोलीस आज करणार आहेत. रियाला ताब्यात घेण्यासाठी पाटणा पोलिसांना एक दिवसाचा अवधी लागू शकतो.

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची 18 जूनला जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री आठ वाजता संपला होता.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

संबंधित बातम्या :

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी महेश भट्ट यांची 2 तास कसून चौकशी, करण जोहरलाही समन्सची शक्यता

(Bihar Police in Mumbai to inquiry Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Death Case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.