6 अभिनेत्यांना डेट, 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, घटस्फोटीत लहान अभिनेत्यासोबत लग्न; कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूडमधील अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड इमेजची आणि तिच्या खाजगी आयुष्याची चर्चा जास्त झाली होती. तिने 6 जणांना डेट केलं आहे.
बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या काही चित्रपटांमुळे प्रचंड प्रसिद्ध झाल्या पण त्यापेक्षा जास्त त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे प्रसिद्ध झाल्या. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड इमेजची आणि तिच्या खाजगी आयुष्याची चर्चा जास्त झाली होती.
6 अभिनेत्यांना डेट ते घटस्फोटीत अभिनेत्यासोबत लग्न
या अभिनेत्रीने 6 अभिनेत्यांना डेट केलं आहे. तसेच याच अभिनेत्यांपैकी एका अभिनेत्यासोबत 9 वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये होती. एवढंच नाही तर 2 घटस्फोटीत 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत तिने लग्नही केलं आहे. ही बॉलिवूड अभिनेत्री आहे बिपाशा बसू.
बिपाशा बसूचा जन्म दिल्लीत जन्मलेल्या आणि कोलकात्या वाढलेली आहे. अभिनेत्रीचा 7 जानेवारी 1979 जन्म झाला. खरंतर ती सुरवातीच्या काळात चित्रपटात तिला बोल्ड इमेजसाठी ओळखली जायची. 46 व्या वर्षीय असलेल्या या अभिनेत्रीच्या डेटिंगचे किस्से बॉलिवूडमध्ये खूप गाजलेयत.
बिपाशा पहिला बॉयफ्रेंड होता मिलिंद सोमण
बिपाशा बसूचा पहिला बॉयफ्रेंड हा मिलिंद सोमण होता. बिपाशाने मॉडेलिंगच्या काळात मिलिंदला डेट केलं होतं. बिपाशा मॉडेलिंगमध्ये आली तोपर्यंत मिलिंद सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध होता.
याचदरम्यान ते मित्र बनले आणि एकमेकांना डेट करू लागले. बिपाशाने नंतर 1996 मध्ये गोदरेज सिंथोली सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली. त्यानंतर, हे जोडी वेगळी झाली.
खरी ओळख ही राज’ याचित्रपटामुळे
बिपाशाला खरी ओळख मिळाली ती ‘राज’ याचित्रपटामुळे. याच चित्रपटादरम्यान ती अभिनेता डिनो मोरियाच्याही जवळ आली. त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली. रिपोर्टनुसार, ‘राज’ चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. पण 2002 मध्ये हे दोघे वेगळे झाले.
नंतर डिनोने एका मुलाखतीत सांगितले होतं की, ‘मी लहान होतो आणि तीही, मी तिला पहिल्यांदा मुंबईत डेट केलं होतं’. या त्याच्या वक्तव्यामुळे बिपाशा आणि डिनो खरंच रिलेशनमध्ये होते यावर शिक्कामोर्तब झालं.
9 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये
डिनोनंतर बिपाशाचं नात सर्वात जास्त चर्चेत आलं ते म्हणजे जॉन अब्राहमसोबत. या दोघांची इंडस्ट्रीतील सर्वात हॉट जोडप्यांपैकी एक मानलं जात होतं. दोघे 9 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
जॉनचं दुसऱ्या मुलीसोबतचं अफेयर समोर आलं, त्या एका मेसेजमुळे हे गुपित उघड झालं होतं. त्यानंतर ती जॉनपासून वेगळी झाली. अन्यथा ही दोघे लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं.
‘बाहुबली’मुळे प्रकाश झोतात आलेला दक्षिण अभिनेता राणा दग्गुबातीचाही या यादीत समावेश आहे. बिपाशा आणि राणा यांनी 2011 मध्ये एकत्र ‘दम मारो दम’ या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले पण हे नातेही फार काळ टिकले नाही. रिपोर्टनुसार, राणाने बिपाशाची फसवणूक केल्यामुळे हे जोडपे वेगळे झाल्याचं म्हटलं जातं.
बिपाशाचे नावही सैफ अली खानसोबतही जोडले गेलं होतं. त्यांच्या लिंकअपची बातमी ‘रेस-2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आली होती. मात्र ऑक्टोबर 2012 मध्ये त्याने करिनासोबत लग्न केलं आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
19 फेब्रुवारी 2014 या तारखेला बिपाशाने अभिनेता हरमन बावेजासोबत तिच्या सहाव्या अफेअरबद्दल सांगितली. तिने ट्विट केलं होतं की, ‘हरमन आणि मी जोडपे आहोत. शेवटी मला ती व्यक्ती सापडली आहे जी माझ्यासारख्या माणसापेक्षा कितीतरी चांगली आहे.’ पण अवघ्या 6 महिन्यांनी हे जोडपे वेगळे झाले.
अखेर करण सिंह ग्रोवरसोबत लग्न
त्यानंतर ‘अलोन’ (2015) चित्रपटाच्या सेटवर बिपाशा करण सिंह ग्रोवरला भेटली होती. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या.
जवळपास एक वर्ष डेट केल्यानंतर बिपाशाने 30 एप्रिल 2016 रोजी बंगाली रितीरिवाजांनुसार करणसोबत लग्न केलं. 12 नोव्हेंबर 2022 मध्ये बिपाशानं मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव देवी असं आहे. बिपाशाच्या आधी करणने दोनदा लग्न केलं होतं. त्यांची पहिली पत्नी श्रद्धा निगम आणि त्यांची दुसरी पत्नी जेनिफर विंगेट होती.