Happy Birthday Hema Malini | वयाच्या 72व्या वर्षीही हेमा मालिनी ‘सुपर फिट’, ‘ड्रीमगर्ल’ने फिटनेसचे रहस्य उलगडले!

बॉलिवूडच्या ‘ड्रीमगर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी आज (16 ऑक्टोबर) आपला 72वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Happy Birthday Hema Malini | वयाच्या 72व्या वर्षीही हेमा मालिनी ‘सुपर फिट’, ‘ड्रीमगर्ल’ने फिटनेसचे रहस्य उलगडले!
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 12:53 PM

मुंबई : बॉलिवूडच्या ‘ड्रीमगर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी (Hema malini) आज (16 ऑक्टोबर) आपला 72वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत. आजही उत्तम नृत्य, अभिनय आणि सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून हेमा मालिनी प्रसिद्ध आहेत. वयाच्या 72व्या वर्षीही हेमा मालिनी यांचे सौंदर्य आणि फिटनेस लोकांना घायाळ करते. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी हेमा मालिनी योगा, सायकलिंग आणि हेल्दी डाएट या त्रिसूत्रीचा अवलंब करतात. आपल्याला देखील हेमा मालिनींसारखे सुंदर आणि फिट दिसण्याची इच्छा असल्यास, त्यांच्या या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे. (Birthday special Actress Hema Malini’s fitness Secret)

योगा आणि प्राणायाम

हेमा मालिनी आजही नृत्याचे कार्यक्रम सादर करतात. मुली इशा आणि आहानासह त्या शास्त्रीय नृत्याचे स्टेज शो आयोजित करतात. नृत्याव्यतिरिक्त हेमा मालिनी योगाकडेही खूप लक्ष देतात. त्या दररोज सकाळी 45 ते 50 मिनिटे योगा करतात. यासह स्वत: ला फिट ठेवण्यासाठी हेमा मालिनी 20 ते 25 मिनिटे सायकलही चालवतात. तंदुरुस्तीचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो, असे म्हणणाऱ्या हेमा मालिनी प्रत्येकाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा सल्ला देतात.

सकस आहार आणि डाएट

व्यायामाबरोबरच निरोगी आहारही फिटनेससाठी खूप महत्त्वाचा असल्याचे हेमा मालिनी सांगतात. त्या नियमितपणे सकस आहाराचे सेवन करतात. त्यांना शाकाहारी आणि घरी बनवलेले जेवण अधिक आवडते. हेमा मालिनी त्यांच्या आहारात साखरेचा अजिबात समवेश करत नाहीत. साखरेऐवजी त्या मधाचा वापर करतात. हेमा मालिनी आपल्या आहारात भाज्या आणि फळांना अधिक महत्त्व देतात. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हेमाजी आठवड्यातून दोन दिवस उपवास करतात. या दरम्यान त्या फळे,  सुका मेवा आणि पनीर खातात. (Birthday special Actress Hema Malini’s fitness Secret)

भरपूर पाणी पिण्याचा सल्ला

‘फिटनेस फ्रिक’ हेमा मालिनी देखील सकस आहारासह भरपूर पाणी पितात. एका मुलाखती दरम्यान हेमा मालिनी यांनी सांगितले की, त्या आपल्या त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पितात. अधिक पाणी पिण्यामुळे शरीर डीहायड्रेट होत नाही. यामुळे दिवसभर शरीरात स्फूर्ती राहते.

(Birthday special Actress Hema Malini’s fitness Secret)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.