Happy Birthday Kapil Sharma | अभिनयाच्या वेडापायी पोलिसाच्या नोकरीला नकार, आता ‘कॉमेडीचा बादशाह’ म्हणून ओळखला जातोय कपिल शर्मा!

| Updated on: Apr 02, 2021 | 10:35 AM

कपिलने पोलिसांची नोकरी सोडून आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. कपिलची जीवन कथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. चला तर जाणून घेऊया कपिलचा हा ‘कॉमेडी किंग’ बनण्याचा संघर्षमय प्रवास...

Happy Birthday Kapil Sharma | अभिनयाच्या वेडापायी पोलिसाच्या नोकरीला नकार, आता ‘कॉमेडीचा बादशाह’ म्हणून ओळखला जातोय कपिल शर्मा!
कपिल शर्मा
Follow us on

मुंबई : छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (kapil sharma) आपल्या विनोदी शैलीने सर्वांचे मन जिंकतो. त्याचा कॉमेडी टायमिंग अतिशय उत्तम आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार्‍या कपिलने स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले आहेत. कपिलचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे झाला. आज, कपिल आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याच्या या संघर्षमय प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत (Birthday Special story how kapil sharma becomes comedy king).

कपिलने पोलिसांची नोकरी सोडून आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. कपिलची जीवन कथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. चला तर जाणून घेऊया कपिलचा हा ‘कॉमेडी किंग’ बनण्याचा संघर्षमय प्रवास…

लहान वयात घराची जबाबदारी

वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा कपिल अवघ्या 23 वर्षांचा होता. वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी कपिलच्या खांद्यावर पडली. कपिलचे वडील पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिलला त्यांची नोकरी मिळत होती. परंतु, उराशी बाळगलेले अभिनयाचे स्वप्ने पूर्ण करायचे असल्यामुळे त्याने हे काम करण्यास नकार दिला. त्यानंतर कपिलच्या मोठ्या भावाला ही नोकरी मिळाली आणि कपिलने घराचा खर्च भागवण्यासाठी पीसीओ बूथवर काम करण्यास सुरू केले (Birthday Special story how kapil sharma becomes comedy king).

स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईकडे कूच…

पीसीओवर काम करत असताना कपिलने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला आला. मुंबईत कपिलने आपल्या करिअरची सुरुवात पंजाबी चॅनल शो ‘हंसदे हसांदे रहो’पासून केली होती. पण, त्याला खरी ओळख ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून मिळाली. कपिलने यापूर्वी अमृतसरमध्ये या शोसाठी ऑडिशन दिले होते, पण तो तेथून रिजेक्ट झाला होता. तरीही त्याने हार मानली नाही आणि पुन्हा दिल्लीत जाऊन ऑडिशन दिले. त्यानंतर या कार्यक्रमात कपिलची निवड झाली. लाफ्टर चॅलेंज जिंकल्यानंतर कपिलने कधीच मागे वळून पाहिले नाही.

‘कॉमेडी किंग’ कपिल

त्यानंतर कपिल शर्मा सोनी टीव्हीचा शो ‘कॉमेडी सर्कस’मध्ये आला. हा शो जिंकल्यानंतर त्याने स्वत:चा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ सुरु केला. ज्यानंतर कपिल पाहता पाहता ‘कॉमेडी किंग’ बनला. कपिलने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. आता लवकरच तो ओटीटी प्लॅटफॉर्मही आपले नशीब आजमावणार आहे.

(Birthday Special story how kapil sharma becomes comedy king)

हेही वाचा :

अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे निधन, कॅनडामध्ये अखेरचा श्वास

शाहरुखच्या कानाखाली आवाज काढणार होत्या जया बच्चन, ‘थप्पड’चा सलमान खानशी होता थेट संबंध! वाचा किस्सा..