Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthaday Special | करिअरच्या उच्च शिखरावर असताना का झाला इंडस्ट्रीमधून गायब?, वाचा हनी सिंगबद्दल…  

प्रसिद्ध गायक-रॅपर ‘यो यो हनी सिंग’ (Honey singh ) आज (15 मार्च) आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहेत. हनीचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबच्या होशियारपूर येथे झाला होता.

Birthaday Special | करिअरच्या उच्च शिखरावर असताना का झाला इंडस्ट्रीमधून गायब?, वाचा हनी सिंगबद्दल...  
हनी सिंग
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 10:37 AM

मुंबई : प्रसिद्ध गायक-रॅपर ‘यो यो हनी सिंग’ (Honey singh ) आज (15 मार्च) आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहेत. हनीचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबच्या होशियारपूर येथे झाला होता. हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग आहे. संगीत उद्योगात प्रवेश करताच तो ‘यो यो हनी सिंग’ झाला. हनी सिंग एक उत्कृष्ट गायक, रॅपर, संगीत निर्माता तसेच एक अभिनेता देखील आहे. पंजाबी चित्रपटांद्वारे त्याने अभिनय जगतातही प्रवेश केला आहे. ज्यासाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘शकल पे मत जा’ या गाण्याने हनीने डेब्यू केला. ज्यानंतर त्याला कधीही मागे वळून पहावे लागले नाही. त्याचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरले (Birthday Special story know about Rapper Honey singh why he takes a break from industry).

पहिल्या गाण्यानंतरच हनी सिंगला यश आले. त्यानंतर त्यांनी ‘हाय मेरा दिल’, ‘चार बॉटल वोडका’, ब्रेकअप पार्टी, ‘ब्लू आईज’ अशी अनेक गाणी गायली, जी रिलीजनंतर खूप लोकप्रिय झाली होती. पण एक वेळ असा आला होता की, हनी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होता आणि अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला.

मानसिक आजाराचा ठरला बळी

2014मध्ये यो यो हनी सिंह अचानक गायब झाला. ज्यानंतर तो बातमी येऊ लागली की, तो ड्रग्सचा बळी ठरला आहे, तर काहींनी म्हटले की हनी सिंगला दारूचे व्यसन लागले आहे. पण तसे काही नव्हते. ब्रेकनंतर हनी परत आला, तेव्हा त्याने सांगितले की 18 महिने त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी पुनर्वसन केंद्रात दाखल असल्याच्या बातम्या माझ्याबद्दल येत होत्या. पण, मी नोएडामध्ये माझ्या घरी होतो. मी बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. हे सुमारे 18 महिने चालले. यावेळी मी 4 डॉक्टर बदलले. औषधांचा प्रभाव माझ्यावर होतच नव्हता आणि माझ्यासोबत विचित्र-विचित्र गोष्टी घडत होत्या (Birthday Special story know about Rapper Honey singh why he takes a break from industry).

हनी सिंग आता पुन्हा परतला आहे आणि एकामागून एक सुपरहिट गाणी घेऊन येत आहे. नुकतेच त्यांचे ‘सैंया जी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात नुसरत भरुचा हनीसोबत दिसली आहे. यावेळी हे गाणे लोकांच्या प्ले लिस्टचा एक भाग आहे.

अभिनयातही आजमावले नशीब!

हनी सिंगने ‘मिर्झा-द अनटोल्ड स्टोरी’ या पंजाबी चित्रपटाद्वारे अभिनय जगतात प्रवेश केला होता. या चित्रपटासाठी त्याला पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. त्याला सर्वोत्कृष्ट ‘पुरुष पदार्पणा’चा पुरस्कार मिळाला. यानंतर त्याने ‘तू मेरा 22 मैं तेरा 22’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात हनी सिंग चक्क कॉमेडी करताना दिसला होता.

(Birthday Special story know about Rapper Honey singh why he takes a break from industry)

हेही वाचा :

वडिलांना आवाज आवडायचा नाही, रिक्षाही चालवली; आनंद शिंदेंचे किस्से वाचाच!

Video : रणबीर कपूर आजारी असतानाही आलियाचा डान्सिंग मूड, लग्नात ‘गेंदा फूल’वर थिरकली !

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.