Birthday Special | केवळ तबलावादनच नव्हे, तर अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावणारे उस्ताद झाकीर हुसेन!

झाकीर हुसेन अवघ्या तीन वर्षांचे होते, जेव्हा त्यांचे वडील उस्ताद अल्लारक्खा खान यांनी त्यांना पखावज शिकवायला सुरुवात केली. त्याच्या काळातील प्रसिद्ध तबला वादकांपैकी एक नाव उस्ताद अल्लारक्खा यांचे देखील होते.

Birthday Special | केवळ तबलावादनच नव्हे, तर अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावणारे उस्ताद झाकीर हुसेन!
उस्ताद झाकीर हुसैन
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:26 AM

मुंबई : आज आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत, त्यांची बोटे तबल्यावर पडताच क्षणी, सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. त्यांची ही अद्भुत कला पाहून सर्वजण म्हणतात, ‘वाह उस्ताद वाह!’ हो.. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते आहेत, प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन! आज अर्थात 9 मार्च शास्त्रीय संगीत दिग्गज आणि प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचा 70वा वाढदिवस आहे. झाकीर हुसेन यांचे नाव देश आणि जगात खूप लोकप्रिय आहे. जेव्हा, झाकीर हुसेन तबल्यावर आपल्या बोटांनी थाप मारतात, तेव्हा कलेचे एक अद्भुत संयोजन पाहायला मिळते (Birthday Special Story on Ustad Zakir Hussain).

झाकीर हुसेन अवघ्या तीन वर्षांचे होते, जेव्हा त्यांचे वडील उस्ताद अल्लारक्खा खान यांनी त्यांना पखावज शिकवायला सुरुवात केली. त्याच्या काळातील प्रसिद्ध तबला वादकांपैकी एक नाव उस्ताद अल्लारक्खा यांचे देखील होते. ते भारतातील एक प्रख्यात कलाकार होते. त्याने झाकीर हुसेन यांना प्रत्येक संगीतचे प्रत्येक पैलू शिकवला. जेव्हा, तबला वादक म्हणून ते कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागले, तेव्हा झाकीर हुसेन खूप लहान होते. झाकीर हुसेन यांचा पहिला एकल संगीत अल्बम 1987मध्ये ‘मेकिंग म्युझिक’ या नावाने प्रसिद्ध झाला.

अभिनयातही आजमावले नशीब!

तथापि, त्यापूर्वी उस्ताद झाकीर यांनी एका अल्बममध्ये अनेक कलाकारांसह एकत्र काम केले होते. पण झाकीर हुसेन यांना त्यांच्या एकल अल्बममधून इतकी प्रसिद्धी मिळेल, याची त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसेल. त्यानंतर झाकीर हुसेन यांनी बर्‍याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. ते अजूनही परदेशात कार्यक्रम करतात. त्यांचे वादन ऐकण्यासाठी दूरदूरच्या देशातील लोक त्यांच्या कार्यक्रमात भाग घेतात. झाकीर हुसेन यांना केवळ संगीताची आवड नाही, तर अभिनयातही त्यांनी आपले नशीब आजमावले होते (Birthday Special Story on Ustad Zakir Hussain).

1983मध्ये आलेल्या ‘हीट अँड डस्ट’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. या चित्रपटात शशी कपूरसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. यानंतर त्यांनी ‘द परफेक्ट मर्डर’ आणि ‘मिस बॅट्स चिल्ड्रन’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. तथापि, 1998 साली जेव्हा शबाना आझमीसोबत सहकलाकार म्हणून ते ‘साज’ चित्रपटामध्ये दिसले, तेव्हा त्यांच्या अभिनयाबद्दल बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटात झाकीर हुसेन यांनी संगीतही दिले. हा एक वादग्रस्त चित्रपट ठरला होता.

‘या’ कारणामुळे चित्रपट ठरला वादग्रस्त!

असे म्हटले जाते की, सई परांजपे यांच्या या चित्रपटाची कथा प्रसिद्ध गायिका भगिनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आयुष्यावर बेतली असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा, लता मंगेशकर यांनी यावर तिखट शब्दांत टीका केली होती. या चित्रपटात झाकीर हुसेन यांनी शबाना आझमीच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. तबला वादक झाकीर हुसेन यांनी मोठ्या पडद्यावर शबाना आझमीला प्रपोज करताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. मात्र, या चित्रपटातील झाकीर हुसेन यांच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.

(Birthday Special Story on Ustad Zakir Hussain)

हेही वाचा :

Amruta Fadnavis | ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.