Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक रात्र घालवायची…बॉबी देओलने दिली होती प्रसिद्ध अभिनेत्रीला वन नाईट स्टँडची ऑफर, अभिनेत्रीचा खुलासा

सुपरस्टार अभिनेता बॉबी देओल याने चक्क एका अभिनेत्रीच्या सौंदर्यावर भाळून तिला वन नाईट स्टँडची ऑफर दिली होती. या अभिनेत्रीने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून बॉबी दओलचे नाव ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

एक रात्र घालवायची...बॉबी देओलने दिली होती प्रसिद्ध अभिनेत्रीला वन नाईट स्टँडची ऑफर, अभिनेत्रीचा खुलासा
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 3:49 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या खासगी आयुष्य वादग्रस्त राहिलं आहे. अशीच एक अभिनेत्री जिच्या लव्हलाइफपासून ते तिच्या बोल्डफोटोशूटची चर्चा तेवढीच झाली आहे. आणि आजही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे.

बॉबी देओलने अभिनेत्रीला दिली वन नाईट स्टँडची ऑफर 

दरम्यान ही अभिनेत्री तिच्या सौंदऱ्यामुळेही तेवढीच चर्चेत होती. अनेक बड्या अभिनेत्याला तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यात सुपरस्टार बॉबी देओलही होता. बॉबी देओलने तर चक्क त्या अभिनेत्रीला वन नाईट स्टँडची ऑफर दिली होती. हा खुलासा स्वत: या अभिनेत्रीने केला आहे.

ही अभिनेत्री आहे 90 च्या दशकातील ममता कुलकर्णी जी आज तिच्या अध्यात्मिक प्रवासामुळे आणि महाकुंभात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली तेव्हापासून ती प्रसिद्धी झोतात आली. अनेकांनी तिच्या महामंडलेश्वर होण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र आता तिला या पदावरून हटवण्यात आलं आहे.

ममता कुलकर्णीला दिली बॉबी देओलने ऑफर 

पण ममता कुलकर्णी 90 च्या दशकातही तेवढीच चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. यात ती तिच्या खासगी आयुष्यामुळेच जास्त प्रसिद्धी झोतात राहिली आहे. आपल्या बोल्डनेसने आणि स्पष्टवक्तेपणाने लोकांच्या मनावर तिने राज्य केलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना ममता कुलकर्णीची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. ज्यात तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल.

ममताने तिच्या मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिला चक्क वन नाईट स्टँडची ऑफर दिल्याचं तिने सांगितलं. एका मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता कुलकर्णीने सांगितलं होतं की, अभिनेता बॉबी देओलने तिला वन नाईट स्टँडसाठी विचारलं होतं.

ममताने स्वत: केला खुलासा 

हा प्रसंग सांगतना ती म्हणाली “मी बरसात सिनेमाची शूटिंग करत होते आणि त्यादरम्यान एका हॉटेलमध्ये थांबले होते. आणि बॉबी देओलही त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. माझा को-अ‍ॅक्टर मिथुन चक्रवर्तीने मला बॉबी देओलशी भेट घालून दिली. बॉबी देओल माझ्यावर फिदा झाला आणि त्यानंतर त्याने माझ्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर दोघे पार्टीला सोबत यायला जायला लागले.”

ममताने पुढे सांगितलं, “जेव्हा ते चांगले मित्र बनले तेव्हा त्याने एक रात्र सोबत घालवण्यासाठी विचारलं.” हे ऐकून अभिनेत्री हैराण झाली. तेव्हा बॉबी देओलचं अफेअर पूजा भट्टसोबत सुरू होतं. ही गोष्ट ममताला माहीत होती. त्यामुळे ममताने त्याला म्हटलं की, जर त्याला ममतासोबत एक रात्र घालवायची असेल तर पहिल्यांदा त्याला गर्लफ्रेंडची परवानगी घ्यावी लागेल . हे ऐकून बॉबी देओलही थक्क झाला आणि त्याने ही गोष्ट मजामस्तीमध्ये उडवून लावली. पण ममताचा मुलाखतीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉबी देओलचे नाव ऐकून नेटकऱ्यांना नक्कीच धक्का बसला.

मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?
मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?.
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?.
नीलम गोऱ्हेंविरोधात 'मविआ'कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद जाणार?
नीलम गोऱ्हेंविरोधात 'मविआ'कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद जाणार?.
स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा कारनामा, पोलिसांचा ड्रेस घालायचा अन्...
स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा कारनामा, पोलिसांचा ड्रेस घालायचा अन्....
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती.
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण.
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य.
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप.
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्.
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO.