मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या अॅनिमल या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही फ्लॉप झाले तर काही हिट ठरले आहेत. पण अॅनिमल सिनेमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी आश्रम या वेब सीरीजमुळे देखील तो चर्चेत आला होता. बॉबी देओलने बादल, सोल्जर, बिछू अशा अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच त्याचा अॅनिमल हा सिनेमा रिलीज झाला असून तो या सिनेमात विलनच्या भूमिकेत आहे.
बॉबी देओलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तो दोन मुलांचा बाप आहे. बॉबी देओलने 1996 मध्ये तान्या देओलशी लग्न केले होते. त्याला आर्यमन आणि धरम अशी दोन मुले आहेत.
बॉबी देओलचे कुटुंब सहसा कुठे दिसत नाहीत. ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. पण तान्या देओलच्या आधी बॉबी देओलच्या आयुष्यात एक अभिनेत्री होती. ते त्याचं पहिले प्रेम होते. पण ते अपूर्ण राहिले.
बॉबी देओल हा नीलम म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात होता. बॉबी देओल आणि नीलम यांना लग्न करायचे होते. पण कौटुंबिक नकार मिळाल्याने दोघांचा विवाह होऊ शकला नाही. बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र या लग्नाच्या विरोधात असल्याचं म्हटले जाते.
कुटुंबाचा विरोध असल्याने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2000 साली नीलमने ऋषी सेठियासोबत विवाह केला होता. पण ते लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर नीलमने 2011 मध्ये समीर सोनीशी लग्न केले होते. नीलम अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम ज्वेलरी डिझायनर देखील आहे.