लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहणं पाप.. काय म्हणाल्या झीनत अमान ? बाथरूम शेअर करणं…

| Updated on: Apr 13, 2024 | 2:48 PM

Bollywood Actress on Relationship : तरुण मुलांना झीनत अमान यांनी दिला बोल्ड सल्ला. लिव्ह इन रिलेशनशिप वर भाष्य करत अभिनेत्री म्हणाली ...

लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहणं पाप.. काय म्हणाल्या झीनत अमान ? बाथरूम शेअर करणं...
Image Credit source: social media
Follow us on

अभिनेत्री झीनत अमान यांनी सौंदर्य आणि अभिनयामुळे एकेकाळी मोठा पडदा खूप गाजवला. त्यांनी एकाहून एक सरस चित्रपटांत काम केलं. मात्र फक्त अभिनय, सौंदर्यामुळेच नव्हे तर झिनत अमान या त्यांच्या सडेतोड वक्तव्यांमुळेही खूप चर्चेत असतात. सोशल मीडियावरही त्या खूप ॲक्टिव्ह असतात. आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात.

नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये भलीमोठी कॅप्शन लिहीली. त्यामध्ये त्यांनी आजच्या पिढीला लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. एका चाहत्याने त्यांचाकडे रिलेशनशिपबद्दल सल्ला मागितला होता, असं त्यांनी नमूद केलं. एवढंच नव्हे तर हा सल्ला जो मी तुम्हाला देत आहे, तोच मी माझ्या मुलांनाही देते, असंही त्यांनी त्यामध्ये लिहीलं.

लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनमध्ये रहाच..

इन्स्टाग्रामवरू काही फोटो झीनत अमान यांनी शेअर केले आणि रिलेशनशिपबद्दल पोस्टही शेअर केली. ‘ गेल्या वेळी तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याकडे रिलेशनशिपबद्दल सल्ला मागितला होता, म्हणून मी आत्तापर्यंत जे बोलले नाही ते सांगत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर मी असा सल्ला देईन की लग्न करण्यापूर्वी तुम्ही (आवर्जून) लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहा. मी माझ्या मुलांनाही हाच सल्ला दिला होचा. तेही लिव्ह इनमध्ये रहात होते / रहात आहेत. ‘

खराब मूड सहन करू शकता ?

झीनत अमान यांनी पुढे त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की ‘ हे मला लॉजिकल वाटतं. दोन लोकांनी आपल्या इक्वेशनमध्ये त्यांचं कुटुंब आणि सरकारला सहभागी करून घेण्यापूर्वी, त्यांनी त्यांच्या नात्याचं अल्टीमेट तपासून पहावं. दिवसभरात काही वेळ उत्तम वागणं खूप सोपं आहे, पण एकाच व्यक्तीसोबत पूर्ण वेळ राहताना काही गोष्टी चेक केल्या पाहिजेत. तुम्ही बाथरूम शेअर करू शकता का ? खराब मूड सहन करू शकता ? रोज जेवण काय करायचं यावर सहमती होईल का ? दोन लोकं सोबत असताना जी छोटी-मोठी भांडणं होतात ती मिटवू शकता का ? हे सगळं आधी चेक केलं पाहिजे’ असं त्यांनी नमूद केलं आहे.

लोकं काय म्हणतील ?

‘ तुमचं एकमेकांशी जुळतं का, ताळमेळ आहे का ? हे चेक करणं महत्वाचं ठरतं. कंपॅटिबिलीटी आहे का ? भारतीय समाजात ‘लिव्ह इन रिलेशनला’ पाप मानले जाते, हे मला माहीत आहे. पण तरीही समाज अनेक गोष्टींबद्दल कडक धोरण स्वीकारतो. लोकं काय म्हणतील ? पण आपलं कुटुंब आणि सरकारला आपल्या नात्यात आणण्यापूर्वी दोन्ही पार्टनर्सनी आपलं नातं पुरेसं तपासलं पाहिजे’ असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.