Aamir Khan Corona | अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. (Aamir Khan tests corona positive)

Aamir Khan Corona | अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण
आमीर खान
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 1:31 PM

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहेत. आमिर खान सध्या होम क्वारंटाईन असल्याची माहिती मिळत आहे. (Aamir Khan tested corona positive)

आमिर खानच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आमिर खान सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. आमिर खानची प्रकृती सध्या बरी आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्यांनी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची  कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमिर खानने केले आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

दरम्यान दोन दिवसांपूर्वी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशन  “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत होते. यावेळी पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यादेखील सहभागी होत्या.  त्याशिवाय समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक,राज्याच्या 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमातील अनेक व्यक्ती क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे.  (Aamir Khan tested corona positive)

दहा दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा 

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात आमिर खानचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दहा दिवसांपूर्वी म्हणजे 14 मार्चला आमिर खानचा वाढदिवस होता. आमिर दरवर्षी आपला वाढदिवस माध्यमांसोबत साजरा करतो. या दरम्यान, आमिर मोकळेपणानं बोलतो, त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलतो. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे आमिरनं त्याचा वाढदिवस माध्यमांसोबत साजरा केला नव्हता. तसेच यंदाही त्याने माध्यमांसोबत वाढदिवस साजरा केला नव्हता.  (Aamir Khan tested corona positive)

संबंधित बातम्या : 

Happy Birthday : आमिर खानचा वाढदिवस, जाणून घ्या काही खास गोष्टी

PHOTO | ना अभिनेत्री, ना मॉडेल, तरीही सोशल मीडियावर आमिर खानच्या लेकीची चर्चा!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.