बॉलिवूडमधील सर्वात मोठा दुश्मन कोण?; अजय देवगणने त्याच व्यक्तीच्या तोंडावर सांगितलं…
Actor Ajay Devgn on Karan Johar in Koffee With Karan Season 8 : रोखठोक अजय देवगण...; बॉलिवूडमधील सर्वात मोठा दुश्मन कोण? अजय देवगणने त्याच व्यक्तीच्या तोंडावर नाव सांगितलं... 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात अजय देवगण नेमकं काय बोलला? दुश्मनीवर काय भाष्य केलं?
मुंबई | 19 डिसेंबर 2023 : बॉलिवूड… एक अशी इंडस्ट्री जिथं कोण कुणाचं दुश्मन अन् कोण कुणाचा मित्र हे वरवर पाहता लक्षात येणार नाही. पण जेव्हा या गोष्टींवर उघड बोललं जातं तेव्हा त्या गोष्टी स्पष्ट होतात. अभिनेता अजय देवगण स्पष्टवक्ता म्हणूल ओळखला जातो. आताही त्याने त्याच्या दुश्मनीवर उघड भाष्य केलं आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा आठवा सिझन प्रचंड गाजतो आहे. अशातच अजय देवगणने या कार्यक्रमात हजेरी लावली आणि विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. या कार्यक्रमात बोलताना अजय देवगणने त्याच्या दुश्मनचं नाव सांगितलं आहे.
अजयचा दुश्मन कोण?
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात बोलताना अजय देवगणने मोठा खुलासा केला आहे. अजयने त्याच्या दुश्मनचं नाव सांगितलं आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर देखील अवाक झाला. एकेकाळी करण जोहर हाच आपला दुश्मन असल्याचं अजय देवगणने सांगितलं. अजयच्या या उत्तरने करण जोहरदेखील आश्चर्यचकित झाला.
करण जोहर अवाक
अजय देवगणने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये बोलताना हा खुलासा केला. त्यानंतर करण जोहरला तर धक्का बसलाच पण तिथं उपस्थित असणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीलाही आश्चर्य वाटलं दोघेही अजयकडे पाहत होते. पण अजय मात्र नेहमीप्रमाणे शांत बसला होता आणि स्माईल त्याच्या चेहऱ्यावर होती.
रोहित शेट्टी काय म्हणाला?
‘सिंघम अगेन’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण आणि रोहित शेट्टी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात प्रमोशनसाठी आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सिंघम सिनेमाच्या यशानंतर आता कसं वाटतंय?, असं करण जोहरने विचारलं तेव्हा रोहित शेट्टी यावर बोलता झाला. एखाद्या सिनेमाने प्रचंड यश मिळवो अथवा तो सिनेमा फ्लॉप ठरो… पण सलमान खान आणि अजय देवगणला मी असंच शांत पाहिलं आहे. त्यांच्यात कोणताही बदल होत नाही, असं रोहित शेट्टी म्हणाला.
‘कॉफी विथ करण’ हा शो प्रचंड लोकप्रिय ठरतो आहे. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी येत असतात. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच्या एपिसोडला चाहत्यांची पसंती मिळाली. त्यानंतर आता अजय देवगण आणि रोहित शेट्टीसोबत नवा एपिसोड येणार आहे. लवकरच हा एपिसोड रिलीज होईल.