Govinda | ‘मीसुद्धा घराणेशाहीचा बळी ठरलो होतो’, रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या गोविंदाच्या संतापाचा उद्रेक!

बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Bollywood Actor Govinda) गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु तो अजूनही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे मुख्य बातम्यांचा आणि चर्चेचा एक भाग बनला आहे.

Govinda | ‘मीसुद्धा घराणेशाहीचा बळी ठरलो होतो’, रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या गोविंदाच्या संतापाचा उद्रेक!
गोविंदा
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 5:07 PM

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Bollywood Actor Govinda) गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु तो अजूनही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे मुख्य बातम्यांचा आणि चर्चेचा एक भाग बनला आहे. अलिकडेच गोविंदाने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने बरेच खुलासे केले आहेत. यावेळी त्याने आपण देखील चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचा अर्थात नेपोटीझमला बळी पडलो असल्याचे म्हटले आहे (Bollywood Actor Govinda says he has been a victim of nepotism).

गोविंदाने उघड केली आयुष्यातील काही रहस्ये!

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत गोविंदाने आपल्या फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच मोठी रहस्ये उघड केली आहेत. मुलाखतीत गोविंदाने चित्रपटात काम मिळवण्यासाठी किती काळ लढा दिला, हे देखील सांगितले. त्याचबरोबर त्याने आपला पुतण्या आणि प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक याच्याशी झालेल्या वादावरही भाष्य केले आहे.

मी देखील ठरलो नेपोटीझमचा बळी!

गोविंदाने सांगितले की, चित्रपटसृष्टी खूप मोठी आहे आणि येथे मी नेपोटीझमला बळी पडलो आहे. एक काळ असा होता की, मला काम मिळणे बंद झाले होते. इतकेच नाही तर, मी अमिताभ बच्चन यांनाही संघर्ष करताना पाहिले आहे. बर्‍याचदा असे घडले की, जेव्हा ते मंचावर यायचे तेव्हा चित्रपटसृष्टीतील काही लोक तिथून निघून जायचे आणि मी त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल मला शिक्षा मिळाली का हे मला ठाऊक नाही. पण लोकांनी त्यांना सोडले आणि त्याऐवजी मला पकडले (Bollywood Actor Govinda says he has a been a victim of nepotism).

गोविंदा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

(Bollywood Actor Govinda says he has been a victim of nepotism)

आपल्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना गोविंदा म्हणाला की, मी बर्‍याच चित्रपटांची स्क्रिप्ट ऐकली आहे आणि काहींवर मी साईन देखील करणार होतो, एवढेच नव्हे तर, त्यापैकी काही मी स्वत: बनवणार होतो. परंतु, 2020 हे वर्ष माझ्यासाठी, तसेच संपूर्ण जगासाठी खूप वाईट ठरले आहे. परंतु यावर्षी आम्हाला एक नवीन आणि चांगले व्यासपीठ देण्यात आले आहे आणि ते म्हणजे ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म! गोविंदाने सांगितले की, त्याने 3-4 कथा ऐकल्या आहेत आणि लवकरच त्यापैकी एका कथेवर काम करणार आहे. गोविंदा पुढे म्हणाले की, चित्रपटांबाबत आजच्या तरूणांची वृत्ती बदलली आहे, त्यांना जागतिक दर्जाचा सिनेमा बघायचा आहे. आणि हे वर्ष अर्थात वर्ष 2021 हे जागतिक सिनेमाचे वर्ष ठरणार आहे.

कृष्णासोबतच्या वादावर गोविंदा म्हणतो…

कृष्णा अभिषेकने त्यांची खिल्ली उडवल्याच्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला की, तो हे का करत आहे किंवा कोण हे सर्व करत आहे, हे मला नक्की माहित नाही. पण, तो एक चांगला मुलगा आहे. परंतु, त्याच्या या कृत्यामुळे माझी प्रतिमा किती खराब होत आहे, हे त्याला माहिती नाही.

(Bollywood Actor Govinda says he has been a victim of nepotism)

हेही वाचा :

कचरा वेचणाऱ्या भावांना मिळाली ‘इंडियन आयडॉल’मध्ये गाण्याची संधी, लोकांनी केले तोंड भरून कौतुक!

Marathi Serial : अरुंधती कसा सोडवणार मुलांच्या आयुष्यातील गुंता?, ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.