मुंबई : बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता शाहरुख खान आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं नाव अव्वल स्थानी येतं. एवढंच नाही तर, दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. शिवाय शाहरुख आणि अमिताभ बच्चन या सुपरस्टार्सचं नातं देखील फार घट्ट आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. पण एक काळ मोठा पडदा गाजवलेल्या अभिनेताभ बच्चन यांना शाहरुख असं काही म्हणाला, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण या प्रकरणानंतर शाहरुख याने ऑन कॅमेरा सर्वांसमोर बिगी बींची माफी देखील मागितली.
शाहरुख खान कायम त्याच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. झगमगत्या विश्वातून शाहरुख खान याच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. दरम्यान, शाहरुख खान याने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा किंग खानने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. कार्यक्रमात अभिनेत्याला बिग बी यांच्या महानतेबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा शाहरुख खान म्हणाला, ‘ते महान असतील पण मी त्यांच्यापेक्षा अधिक महान आहे…’
अनेक वर्षांनंतर जेव्हा शाहरुख ‘फॅन’ सिनेमाचं प्रमोशन करत होता. तेव्हा अभिनेत्याला बिग बी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा किंग खान म्हणाला, ‘लहान होतो तेव्हा आणि लहानपणी अशा गोष्टी कोणीही करतं. लहान मुलगा समजून माफ करा. मी सर्वांना सांगेल स्वतःवर विश्वास ठेवा. पण तरुण वयात थोडा जास्त आत्मविश्वास असतो… ज्यामुळे प्रत्येक जण चुकी करतं…’ असं किंग खान म्हणाला.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला. बिग बी अपघातानंतर त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत.
‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’ सिनेमाने फक्त देशातच नाही तर, संपूर्ण जगात अनेक विक्रम मोडले. त्यामुळे किंग खान याचा आगामी सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.