Bollywood Corona | अक्षय कुमार-गोविंदानंतर आता भूमी पेडणेकरलाही कोरोनाची लागण! सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) आणि गोविंदा (Govinda) यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हीलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

Bollywood Corona | अक्षय कुमार-गोविंदानंतर आता भूमी पेडणेकरलाही कोरोनाची लागण! सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
भूमी पेडणेकर
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 12:23 PM

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हजारो लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. सामान्य जनताच नाही तर, बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स देखील या विषाणूला बळी पडले आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) आणि गोविंदा (Govinda) यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हीलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल माहिती दिली आहे (Bollywood Actress Bhumi Pendnekar tested corona positive).

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, तिला कोरोनाची लक्षणे आहेत आणि तीने स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे. ती म्हणाली, मी डॉक्टरांनी दिलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. आपण माझ्या संपर्कात आला असल्यास, कृपया त्वरित आपली चाचणी करून घ्या. मी स्टीम, व्हिटामिन सी आणि पौष्टिक अन्न खात आहे. तसेच, माझे मन प्रसन्न ठेवत आहे. कृपया या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका. मीसुद्धा सर्व खबरदारी घेतल्या होत्या, तरी देखील मी या विळख्यात अडकले. नेहमी मास्क घाला, आपले हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करा.

पाहा भूमीची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Bhumi ? (@bhumipednekar)

 (Bollywood Actress Bhumi Pendnekar tested corona positive)

सेलेब्स अडकतायत कोरोनाच्या विळख्यात

देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स देखील या विळख्यात अडकले आहेत. नुकताच अक्षय कुमार या विषाणूच्या विळख्यात अडकला आहे. आता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय सध्या त्याच्या आगामी ‘राम सेतु’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षयबरोबरच या चित्रपटातील 45 कलाकारही या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांत आलिया भट्ट, रणबीर कपूर, आमीर खान, संजय लीला भन्साळी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कोरोना विषाणू संक्रमित झाले आहेत.

भूमीने नुकतेच संपवले चित्रीकरण

भूमी पेडणेकर लवकरच अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत ‘बधाई हो’चा सिक्वेल ‘बधाई दो’मध्ये दिसणार आहे. भूमीने नुकतेच ‘बधाई दो’चे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. काही काळापूर्वी भूमीचा ‘दुर्गामती’ हा चित्रपट रिलीज झाला होता, ज्यामध्ये तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली आहे. या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेला लोकांनी खूप पसंती दिली होती. तथापि, हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता, परंतु काही खास जादू दाखवू शकला नाही.

(Bollywood Actress Bhumi Pendnekar tested corona positive)

हेही वाचा :

Akshay Kumar | कोरोनाची लागण झालेल्या ‘खिलाडी’ कुमारची तब्येत खालवली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट, अक्षय कुमारपाठोपाठ तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.