Dia Mirza | 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह, दीड महिन्यात बेबी बम्प, दिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट

15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत दिया मिर्झाचा विवाह झाला. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. (Dia Mirza shares baby bump)

Dia Mirza | 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह, दीड महिन्यात बेबी बम्प, दिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट
अभिनेत्री दिया मिर्झा आणि पती वैभव रेखी
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 10:32 AM

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) वयाच्या 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढली. 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर दियाने वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) लगीनगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत थेट मालदीव्सहून गुड न्यूज दिली. त्यामुळे चहाटळ चाहत्यांनी दियाला ट्रोल करायलाही सुरुवात केली. (Bollywood Actress Dia Mirza shares baby bump photo know story of second marriage with Vaibhav Rekhi)

मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनलचा किताब

2000 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी दियाने मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हा मानाचा किताब पटकावला. पुढच्याच वर्षी रहना है तेरे दिल में या सिनेमातून तिने बॉलिवूडचे दरवाजे ठोठावले. तेव्हापासूनच दियाने रसिकांच्या हृदयातही घर केलं. पुढे दम, तुमसा नही देखा, ब्लॅकमेल, लगे रहो मुन्नाभाई अशा सिनेमातून दिया झळकत राहिली. अभिनेत्री म्हणून लक्षात रहावी अशी एकही व्यक्तिरेखा दियाच्या वाटेला आली नाही, मात्र आपल्या चेहऱ्यावरील गोडव्यातून ती लक्षात राहिली.

साहिल संघाशी लग्नगाठ आणि घटस्फोट

दिया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार साहिल संघाशी लग्नगाठ बांधली. साहिल आणि दिया तब्बल पाच वर्ष प्रेमात होते. 2009 मध्ये दिया साहिलला एका कामानिमित्त पहिल्यांदा भेटली होती. भेटीचं रुपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झालं. पाच वर्षांच्या संसारानंतर दियाने साहिलसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दियाने आपल्या घटस्फोटाची घोषणाही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच 2019 मध्ये केली होती.

चार वर्षांनी लहान वैभवशी दुसरा विवाह

15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत दिया मिर्झाचा विवाह झाला. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. वैभव हा दियापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. सध्या ते वाद्र्यातील पाली हिल भागात राहतात. वैभव हा इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. दियाने आपल्या नात्याविषयी जाहीर कबुली लग्न होईपर्यंत दिली नव्हती. मात्र ते 2020 मध्ये भेटल्याचं बोललं जातं. लॉकडाऊनच्या काळात ते एकत्रच राहत होते.

महिला पौराहिताच्या उपस्थितीत लग्न

दिया-वैभवच्या लग्नात अनेक नव्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्यांनी लग्नात जुन्या परंपरांना मागे सारुन अनेक नव्या गोष्टींचं अनुकरण केलं. मंगलाष्टकं किंवा इतर विधींसाठी चक्क महिला पौरोहितांना निमंत्रण होतं. विशेष म्हणजे दियाच्या लग्नात कन्यादानाचा विधी पार पडला नाही. याशिवाय इतर पारंपरिक चालिरितींना न पाळता दिया पतीसोबत सासरी गेली.

नवऱ्याची पहिली मुलगीही सोबत

दिया सध्या वैभवसोबत हनिमूनला आहे. वैभव आणि त्याची पहिली पत्नी सुनैना यांना समीरा नावाची एक मुलगी आहे. समीरा सध्या दिया आणि वैभवसमवेत मालदीव्समध्ये आहे.

संबंधित बातम्या :

दिया मिर्झा होणार आई, मालदिवहून बेबी बंपचे फोटो पोस्ट

ना कन्यादान, ना पारंपरिक रितीरिवाज, मंगलाष्टिका म्हणायला महिला भटजी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जगावेगळा विवाह सोहळा

(Bollywood Actress Dia Mirza shares baby bump photo know story of second marriage with Vaibhav Rekhi)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.