Taimur Ali Khan | छोट्या भावाच्या आगमनानंतर तैमुर झाला जबाबदार, आई करीनाला दिलं खास गिफ्ट!

नवाब सैफ आणि करीना कपूरचा चिमुकला तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आता मोठा भाऊ झाला आहे. मोठा भाऊ झाल्यानंतर, आता तैमूर खूपच जबाबदार झाला आहे.

Taimur Ali Khan | छोट्या भावाच्या आगमनानंतर तैमुर झाला जबाबदार, आई करीनाला दिलं खास गिफ्ट!
तैमुर अली खान
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:10 AM

मुंबई : नवाब सैफ आणि करीना कपूरचा चिमुकला तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आता मोठा भाऊ झाला आहे. मोठा भाऊ झाल्यानंतर, आता तैमूर खूपच जबाबदार झाला आहे. तो आता मोठा मुलगा होण्याची संपूर्ण जबाबदारी घेत आहे. करीनाने तैमुरचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सर्वांसाठी काहीतरी खास पदार्थ बनवताना दिसत आहे. या फोटोमध्ये तो जे काही बेक करतो आहे, त्याला त्याने स्वतःचे, लहान भाऊ, करीना (Kareena Kapoor-Khan) आणि सैफ (Saif Ali Khan) या प्रत्येकाचे आकार दिले आहेत. चौघांसाठी काहीतरी तैमुर काही तरी खास बेक करत आहे (Bollywood Actress Kareena Kapoor shares Taimur Ali Khan adorable photo on social media).

फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ’My Men in frame’. या फोटोत तैमुर खूप गोंडस दिसत आहे. करीनाच्या या पोस्टवर सर्व जण तैमूरच्या या प्रतिभेचे कौतुक करत आहेत. तैमूरने यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे, ज्यात तो खूप क्यूट दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तैमूरचा आई करीनासोबतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो पापाराझींच्या कॅमेरावर ओरडला आणि धावताना समोरच्या दरवाज्याच्या काचेवर आदळला होता.

पाहा तैमूर अली खानचा क्युट फोटो

(Bollywood Actress Kareena Kapoor shares Taimur Ali Khan adorable photo on social media)

दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूर ठेवणार!

करीना आणि सैफने ठरवले आहे की, आता ते आपल्या दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूर ठेवणार आहेत. तैमूर ज्या प्रकारे नेहमीच चर्चेत राहिला होता, तसे त्यांच्या या लेकाच्या बाबतीत होणार नाही. दोघेही त्या मुलाला पापाराझीसमोर आणणार नाहीत आणि त्याच्यासंबंधित अपडेट सोशल मीडियावर शेअर करणार नाहीत.

यामुळे होतोय नामकरणाला विलंब

गेल्या काही दिवसांपासून तैमूरच्या धाकट्या भावाच्या नावाबद्दल जोरदार चर्चा आहे. सैफ आणि करीनाने अद्याप लहान मुलाचे नाव निश्चित केले नाही आणि त्यामागचे कारण शर्मिला टागोर असल्याचे सांगितले जात आहे. खरं तर, शर्मिला आजकाल दिल्लीत आहे आणि कोव्हिडमुळे तिला दिल्लीहून मुंबईचा प्रवास करता येत नाहीय आणि त्या अद्याप धाकट्या नातवाला भेटल्या देखील नाहीत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, सैफ आणि करीनाच्या दुसर्‍या मुलाचे नाव शर्मिला आणि करीनाची आई बबिता दोघी मिळून ठेवणार आहेत. मात्र, शर्मिला अद्याप मुंबईला आल्या नाहीत, म्हणून मुलाचे नामकरण करण्यास आणखी उशीर होऊ शकतो.

सैफ-करीनाचे व्यावसायिक आयुष्य

करीना आणि सैफच्या व्यावसायिक जीवनाविषयी बोलायचे तर, बेबो लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनाबरोबर आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. त्याच वेळी सैफ अली खान ‘भूत-पोलीस’ या चित्रपटात दिसणार असून, या चित्रपटात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस देखील झळकणार आहेत.

(Bollywood Actress Kareena Kapoor shares Taimur Ali Khan adorable photo on social media)

हेही वाचा :

SSR Drugs Case | रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार, NCBकडून जामिनाविरोधात याचिका दाखल!

Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत, संघर्षमय प्रवासाला उजाळा देत म्हणाली…

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....