कतरिनाने नवी रेंज रोवर घेतली, 35 लाखांचा फक्त टॅक्स भरला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना महागड्या गाड्या खरेदी करण्याचीा छंद जडला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी काही महिन्यांपूर्वी मर्सिडीज बेन्ज व्ही क्लास  (Mercedes-Benz V Class) ही महागडी गाडी खरेदी केली होती. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नवी कोरी रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. कतरिना कैफने मार्च महिन्यात अल्ट्रा लग्जरी रेंज रोव्हर […]

कतरिनाने नवी रेंज रोवर घेतली, 35 लाखांचा फक्त टॅक्स भरला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना महागड्या गाड्या खरेदी करण्याचीा छंद जडला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी काही महिन्यांपूर्वी मर्सिडीज बेन्ज व्ही क्लास  (Mercedes-Benz V Class) ही महागडी गाडी खरेदी केली होती. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नवी कोरी रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे.

कतरिना कैफने मार्च महिन्यात अल्ट्रा लग्जरी रेंज रोव्हर SE Vogue एसयूव्ही खरेदी केली होती. या गाडीची किंमत 2 कोटी 37 लाख रुपये आहे. कतरिनाने खरेदी केलेल्या गाडीचा रंग पांढरा आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या टॅक्स, रजिस्ट्रेशन आणि इतर गोष्टींसाठी कतरीनाने तब्बल 35 लाख रुपये भरले आहेत.

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर या गाडीचा एक फोटो शेअर केला आहे. यात कतरीनाने लाल रंगाचा वन पीस आणि डेनिम जॅकेट घातला आहे. ”तुम्ही दिलेल्या या अद्भुत अनुभवाबद्दल मोदी मोटर्स जॅगवॉर लँड रोवर वरळी यांचे धन्यवाद” असे कॅप्शन कतरिनाने या फोटोला दिले आहे.

कतरिनाने अल्ट्रा लग्जरी रेंज रोव्हर SE Vogue एसयूव्ही ही गाडी खऱेदी केली आहे. यातील लाँग व्हीड बेस मॉडेलची तिची गाडी आहे. या गाडीत 4.4 लीटर एसडी-व्ही 8 टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे. यात पॅडेल शिफ्टर्ससोबत 8 स्पीड ऑटोमैटिक ट्रान्समिशन मिळते. कतरीनाने खरेदी केलेल्या या गाडीचा नंबर 8822 असा आहे.

View this post on Instagram

Thank you Modi Motors Jaguar Land Rover Worli for the wonderful experience @landrover_modimotors #RangeRover

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सध्या कतरिनाकडे 3 ते 4 महागड्या गाड्या आहेत. त्या गाड्यांची किंमत प्रत्येक 50 ते 65 लाख रुपये आहे. काही महिन्यांपूर्वीच कतरिनाने ऑडी कार खरेदी केली होती.

कतरिना सध्या भारत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिनासोबत या चित्रपटात सलमान खान दिसणार आहे. त्यासोबतच जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर हे कलाकारही भारत चित्रपटात दिसणार आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.