‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रसिद्ध सितारवादक ऋषभ शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. बॉलिवूडमध्ये यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओमुळे या चर्चांना अजूनच उधाण आलं आहे. दरम्यान ही बॉलिवूड अभिनेत्री कोण आहे माहितीये का?
बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चेहरे येतात तसेच सेलिब्रिटींच्या नवीन जोड्या बनतानाही दिसतात. नुकतीच बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्री डेट करत असेलला तरूण हा कोणी अॅक्टर नाही तरीही सेलिब्रिटींपासून त्याचे सगळेच चाहते आहते. तो म्हणजे प्रसिद्ध सितार वादक ऋषभ रिखीराम शर्मा.
बॉलिवूडसह साउथमध्येही आहे या अभिनेत्रीचा डंका
ऋषभचे नाव ज्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे तिने हिंदीसह साउथ चित्रपटांमध्ये काम केलं असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तर, ऋषभ बॉलिवूडमधला किंवा फिल्म इंडस्ट्रीतला नसला तरी तो एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीये.
प्रसिद्ध सितार वादक ऋषभ रिखीराम शर्मा नुकताच या अभिनेत्रीसोबत दिसला होता. तेव्हापासून या दोघांच्या जोडीच्या नावाची चर्चा सर्वत्र आहे.ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे सान्या मल्होत्रा
View this post on Instagram
सान्या आणि ऋषभचे फोटो व्हायरल
या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी कमेंट करत या जोडीला प्रेम आणि आपली पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो पाहिल्यानंतर सान्या आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज नेटकरी करत आहेत.
सान्या आणि ऋषभ कार्यक्रमात सहभागी
दोघांचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहेत. सान्या मल्होत्रा आणि ऋषभला एकत्र पाहून चाहत्यांनी देखील या जोडप्याचे खूप कौतुक केलं आहे. दरम्यान फोटोमध्ये सान्या आणि ऋषभ एका कार्यक्रमात सहभागी झाल्याच दिसत आहे. चाहत्यांना या दोघांचीही जोडी प्रचंड आवडली आहे.
View this post on Instagram
ऋषभ आणि सान्याची जोडी चाहत्यांच्या पसंतीस
ऋषभ शर्मा हा प्रसिद्ध सितार वादक आणि गायक आहे. त्याचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ऋषभ शर्माचाही वेगळा चाहती वर्ग आहे.
इन्स्टाग्रामवर त्याचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ऋषभ शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो भारतात आणि भारताबाहेर शो करत असतो . दरम्यान ऋषभ आणि सान्याच्या नात्याबद्दल जी चर्चा सुरु आहे त्यावर अजून या जोडीने मात्र कोणतेही भाष्य केलेलं नाही. पण तरीही चाहत्यांना मात्र या दोघांची जोडी आवडताना दिसतेय.