मुंबई : सध्या ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल यांनी दमदार असा अभिनय केला आहे. सध्या त्यांच्या अभिनयाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच या चित्रपटातील बोल्ड सीन देखील चांगलेच चर्चेत आहेत. सोबतच आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती अॅनिमल चित्रपटात रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारलेली तृप्ती डिमरी.
या चित्रपटात रश्मिका मंदाना सोबत तृप्ती डिमरीही दिसली आहे. त्यामुळे सध्या तृप्तीला भाभी-2 म्हणून सोशल मीडियावर ओळखलं जात आहे. अॅनिमल चित्रपटात रणबीर आणि तृप्तीचे न्यूड सीन चांगलेच चर्चेत आहेत. पण तुम्हाला माहितीये का की, या चित्रपटात रणबीर सोबत असे इंटिमेट सीन देण्यासाठी बॉलिवूडच्या एका सुपरस्टारच्या मुलीनं ऑडिशन दिलं होतं. पण काही कारणांमुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं. त्यानंतर तृप्तीची निवड करण्यात आली. तर आता ही सुपरस्टारची मुलगी नेमकी आहे तरी कोण याबाबत जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅनिमल या चित्रपटात भाभी-2 म्हणजेत तृप्ती डिमरीनं साकारलेल्या जोया या भूमिकेसाठी सैफ अली खानची मुलगी सारा अली खाननं ऑडिशन दिलं होतं. सारा ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक होती, पण संदीप रेड्डी वांगा यांना शंका होती की इतके हॉट सीन्स असलेले इंटिमेंट सीन्स करू शकेल का?, त्यामुळे त्यांनी सारा ऐवजी तृप्तीची निवड केली.
दरम्यान, रणबीर कपूर आणि सारा अली खान यांच्यात एक खास नातं आहे. कारण सैफ अली खाननं करीना कपूरशी लग्न केलं आहे. तर रणबीर हा करीनाचा भाऊ आहे. त्यामुळे सारा आणि रणबीरमध्ये मामा-भाचीचं नातं आहे. या कारणामुळे देखील संदीप रेड्डी यांनी साराला या सीन्ससाठी रिजेक्ट केलं असून शकतं, असं म्हटलं जातंय.