बॉलीवूडच्या या हिरोला एसबीआयकडून दर महिन्याला मिळते 18 लाख भाडे, काय आहे कारण ?
बॉलीवूडच्या अनेक स्टार मंडळी अभिनयासोबत रियल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक करीत असतात. त्यात बॉलीवूडचा एका स्टारने आपला बंगला एसबीआय बॅंकेला देऊन भरभक्कम कमाई सुरु केली आहे.
बॉलीवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन एक चांगला अभिनेता असण्याबरोबरच एक चांगल्या गुंतवणूकीमुळे व्यावसायिक क्षेत्रातही प्रसिद्ध आहे. त्याने उचलेल्या एका स्मार्ट पाऊलामुळे त्याचा चांगला फायदा होत आहे. अभिषेक बच्चन याने आपल्या जुहू येथील बंगल्यातील ग्राऊंड फ्लोअर एसबीआय बॅंकेला भाड्याने दिला आहे. त्यातून त्याला महिन्याला 18 लाख भाडे मिळत आहे.
अभिषेक बच्चन याने आपला प्रसिद्ध जुहू येथील बंगला अम्मू आणि वत्सचा ग्राऊंड फ्लोअरला भारतीय स्टेट बॅंकेला भाडेपट्ट्याने दिले आहे. ही जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने याला जादा भाडे मिळत आहे. त्यामुळे या जागेचे त्याला मोठे भाडे मिळत आहे. अशा प्रकारे स्मार्ट गुंतवणूकीमुळे अभिषेक बच्चन याना चांगला फायदा मिळत आहे.एसबीआयच्या सोबत अभिषेक बच्चन यांनी पंधरा वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे वित्तीय सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबियांना एक वित्तीय सुरक्षा मिळणार आहे.
18.9 लाख रुपयांचे मासिक भाडे
या करारामुळे अभिषेकला एसबीआय बॅंक दर महिन्याला 18.9 लाख रुपयांचे भाडे मिळते. यात भाड्यात दरवर्षी वाढ देखील होणार आहे. पहिल्या पाच वर्षानंतर भाडे 23.6 लाख प्रति महिना होणार आहे. दहा वर्षांनंतर हे भाडे वाढून 29.5 लाख होणार आहे. एसबीआयला दिलेली जागा बच्चन कुटुंबाच्या जलसा निवास स्थानाजवळ आहे. त्यामुळे त्याला अधिकच महत्व आहे. जुहू येथील 3,150 चौरस फूट जागा भाड्याने दिली आहे.