Siddharth Kiara Honeymoon: सिद्धार्थ आणि कियारा हनीमूनला का जाणार नाहीत? कारण वाचून तुम्ही म्हणाल, बरोबरच आहे..!

Siddharth Malhotra Kiara Avani Wedding:बॉलिवूडधलं हॉट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चेनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Siddharth Kiara Honeymoon: सिद्धार्थ आणि कियारा हनीमूनला का जाणार नाहीत? कारण वाचून तुम्ही म्हणाल, बरोबरच आहे..!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 9:35 AM

Siddharth Malhotra Kiara Avani Wedding:बॉलिवूडधलं हॉट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चेनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या सुंदर जोडप्याच्या लग्नाचे फोटो (Siddharth Kiara Wedding Photos) कधी एकदा समोर येतात, याचीच प्रतीक्षा नेटकऱ्यांना लागली होती. अखेर काल हे फोटो समोर आले. या जोडप्यानं अत्यंत खासगी पद्धतीने लग्न केल्याने त्याची चर्चा जास्त झाली. राजस्थानमधील जैसलमेर (Jaisalmer) येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये (Suryagadh Palace) सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्न केलं. आता लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर हे जोडपं हनीमूनला कुठे आणि कधी जाणार, हे प्रश्न विचारले जात आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, हे जोडपं सध्या तरी हनीमूनला जाणार नाही.

Siddharth आणि Kiara आताच हनीमूनला का जाणार नाहीत?

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान वेगाने शेअर केले जात आहेत. या जोडप्यावर असंख्य चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या तरी हे कपल हनीमूनला जाणार नाही. कामासाठीची कमिटमेंट हे तर एक कारण आहेच, पण त्यापेक्षाही मोठं कारण आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

आणखी कोणतं कारण?

सिद्धार्थ आणि कियारा हे दोघंही सध्या टॉपचे अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर काम आहे, हे जाहीरच आहे. या कामामुळे हनीमून लांबणीवर पडू शकतं. पण त्यापेक्षाही आणखी एक कारण आहे. जैसलमेर येथे सिद्धार्थ किआराचं लग्न झालंय. पण पंजाबी आणि सिंधी पद्धतीच्या विवाहानंतरचे विधी होणं बाकी आहे. हे विधी झाल्यानंतरच सिद्धार्थ आणि किआरा हनीमूनला जातील, असं सांगण्यात येतंय.

आता परमनंट बुकिंग…

सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे पोस्ट करताना त्यांनी कॅप्शन लिहिलंय.. ‘अब हमारी परमनंट बुकिंग हो गई है… हम अपनी आगे की जर्नी पर आपका आशीर्वाद और प्यार चाहते है..’

वर्षभर लग्नाची चर्चा

सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची गेल्या वर्षभरापासून जोरदार चर्चा होती. काल अखेर या जोडप्याच्या लग्नाचे फोटो शेअर झाले. कियाराने मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला बेबी पिंक आणि सिल्व्हर रंगाचा लहंगा घातला होता. तर सिद्धार्थने त्याच डिझायनरची गोल्डन शेरवानी घातली होती. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.