Celebs Death Became Mystery : सुशांतच नाहीतर ‘या’ अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्य अजूनही आलं नाही समोर!

काही स्टार्सच्या मृत्यूबाबतच्या केस अजूनही सुरू आहेत. तर आज आपण अशा स्टार्सची नावे जाणून घेणार आहोत जे आज या जगात नसले तरी त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

Celebs Death Became Mystery : सुशांतच नाहीतर 'या' अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मृत्यूचं सत्य अजूनही आलं नाही समोर!
सुशांतवर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल मुलाखतीत संजना म्हणाली, 'मी आणि सुशांत रंगत असलेल्या चर्चांमुळे त्रस्त होतो.' शिवाय 'माझ्यावर कोणतेही अत्याचार झाले नाहीत...' असं देखील संजना सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाली होती. 'दिल बेचारा' सिनेमा सुशांतच्या निधनानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांचं सिनेमाला भरभरुन प्रेम मिळालं.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 9:22 PM

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते किंवा अभिनेत्रींच्या अचानक एक्झिटमुळे सिनेसृष्टीला मोठे धक्के बसले आहेत. यामध्ये सुशांत सिंग राजपूत असो किंवा दिशा सालियन असो अशा अनेक कलाकारांच्या मृत्यूमुळे चाहत्यांसोबत संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. तसंच अशा कलाकारांचे मृत्यू इतके संशयास्पद झाले आहेत की त्याचे गूढ आजपर्यंत उलगडले नाहीये. तर काही स्टार्सच्या मृत्यूबाबतच्या केस अजूनही सुरू आहेत. तर आज आपण अशा स्टार्सची नावे जाणून घेणार आहोत जे आज या जगात नसले तरी त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा त्याच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. तसंच त्याच्या शरीरावर काही खूना देखील सापडल्या होत्या. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करून तिची कसून चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र सुशांतच्या मृत्यूचं कारण अजूनही समजलेलं नाहीये.

दिव्या भारती

दिव्या भारती ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिनं अगदी कमी वयातच जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या मृत्यूनं सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तिचा मृत्यू 1993 मध्ये झाला. मात्र, तिचा मृत्यू अपघातातच झाला की तिची हत्या करण्यात आली याचं गूढ कायम आहे.

दिशा सालियन

दिशा सालियनच्या मृत्यूने सगळीकडे खळबळ उडाली होती. तिच्या मृत्यूनंतर तिचा प्रियकर सूरज पांचोलीवर अनेक आरोप करण्यात आले होते. त्याच्यावर अनेक वर्ष केस चालू होती पण काही दिवसांपूर्वीच त्याची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र दिशाचं मृत्यूचं कारण अजूनही समजलेलं नाहीये.

नफीसा जोसेफ

नफिसा जोसेफनं वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिच्या घरच्यांनी तिचं लग्न तुटल्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं होतं. पण अजूनही मृत्यूचं खरं कारण समोर आलेलं नाहीये.

प्रत्यूषा बॅनर्जी

बालिका वधू या मालिकेतून आनंदी ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यनं सर्वांनाच धक्का बसला होता. तिनं गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र तिच्या आत्महत्येचं कारण अजूनही समजलेलं नाहीये.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.